मुक्तपीठ टीम
बँक ऑफ बडोदामध्ये आयटी ऑफिसर या पदासाठी ४० जागा, आयटी प्रोफेशनल या पदासाठी १२ जागा अशा एकूण ५२ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २८ डिसेंबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- १) बी.ई/ बी.टेक (कॉम्प्युटर सायन्स/ आयटी) २) १/३/६ वर्षांचा अनुभव
- पद क्र.२- १) बी.ई/ बी.टेक (कॉम्प्युटर सायन्स/ आयटी) २) १० वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
पद क्र. १ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २३ ते ४० वर्षे, पद क्र. २ साठी ३२ ते ४५ वर्षांपर्यंत वय असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून ६०० रूपये शुल्क आकारले जाणार तर एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ महिला उमेदवारांकडून १०० रूपये शुल्क आकारले जाणार.
अधिक माहितीसाठी बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइट https://www.bankofbaroda.in/ वरून माहिती मिळवू शकता.