मुक्तपीठ टीम
भारतीय रिझर्व्ह बँकेत सहाय्यक या पदासाठी एकूण ९५० जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०८ मार्च २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. ही भरती संपूर्ण भारतात करण्यात येणार आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) ५०% गुणांसह पदवीधर २) संगणकावर वर वर्ड प्रोसेसिंगचे ज्ञान असणे आवश्यक आह
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २० ते २८ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून ४५० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ ईएक्सएसएम या उमेदवारांकडून ५० रूपये शुल्क आकारले जाणार.
अधिक माहितीसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत वेबसाइट https://www.rbi.org.in/ वरून माहिती मिळवू शकता.