मुक्तपीठ टीम
न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये डेप्युटी चीफ फायर ऑफिसर ए या पदासाठी ३ जागा, स्टेशन ऑफिसर ए या पदासाठी ४ जागा, मेडिकल ऑफिसर डी या पदासाठी ८ जागा, मेडिकल ऑफिसर/ सी या पदासाठी ७ जागा, टेक्निकल ऑफिसर डी या पदासाठी ५० जागा अशा एकूण ७२ पदांवर भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २० एप्रिल २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) पद क्र.१- ५०% गुणांसह १२वी (केमिस्ट्री) उत्तीर्ण + विभागीय अधिकारी कोर्स+ ६ वर्षे अनुभव किंवा पद क्र.1: ५०% गुणांसह12वी (केमिस्ट्री) उत्तीर्ण + विभागीय अधिकारी कोर्स+ ०६ वर्षे अनुभव किंवा बी.ई. (फायर) + २ वर्षे अनुभव
२) पद क्र.२- ५०% गुणांसह १२वी (केमिस्ट्री) उत्तीर्ण + स्टेशन अधिकारी कोर्स+ अवजड वाहन चालक परवाना ५ वर्षे अनुभव + किंवा बी.ई. (फायर)
३) पद क्र.३- एमडी/ एमएस/ एमडीएस
४) पद क्र.४- एमबीबीएस+पीजी डिप्लोमा किंवा एमबीबीएस + १ वर्ष अनुभव
५) पद क्र.५- ६०% गुणांसह बी.ई./ बी.टेक (मेकॅनिकल / प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल अॅन्ड इलेक्ट्रॉनिक्स / सिव्हिल) आणि ४ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
पद क्र.१, २, ३ आणि ५ या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ४० वर्षे असावे तर, पद क्र.४ या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्षे असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या जनरल, ओबीसी, इडब्ल्यू उमेदवारांकडून ५०० रूपये शुल्क आकारले जाईल तर, एससी, एसटी, पीडब्ल्यूबीडी, डीओडीपीकेआयए आणि महिला उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी
न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://www.npcil.nic.in/Content/Hindi/index.aspx वरून माहिती मिळवू शकता.
पाहा व्हिडीओ: