मुक्तपीठ टीम
वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये वैद्यकीय विभागातील विविध पदांच्या ६६ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. मुलाखतीची तारीख २३ आणि २४ मार्च २०२१ आहे. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी (पुर्ण वेळ) आणि (अर्ध वेळ) साठी अर्ज करणारा उमेदवार हा एमबीबीएस असणे आवश्यक तसेच स्टाफ नर्ससाठी बीएससी (नर्सिंग) औषध निर्मातासाठी बी. फार्म / डी. फार्म आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञसाठी डीएमएलटी असणे आवश्यक.
वयोमर्यादा
२३, २४ मार्च २०२१ रोजी
पद क्र.१ & २: ७० वर्षांपर्यंत
पद क्र.३ ते ५: ६५ वर्षांपर्यंत
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्यां खुल्या प्रवर्गासाठी १५० रुपये तर मागासरवर्गीयांसाठी १०० रुपये शुल्क आकारले आहेत.
वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइट https://vvcmc.in/vvmc/?page_id=523&lang=en वरून माहिती मिळवू शकता.
या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.