मुक्तपीठ टीम
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये ट्रेनी इंजिनीअर-१ या पदासाठी ३८ जागा, प्रोजेक्ट इंजिनीअर-१ या पदासाठी १७ जागा अशा एकूण ५५ जागांवर ही नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०१ जून २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. या बातमीविषयी अधिक माहितीसाठी व्हिडीओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली संबंधित बातमीची लिंक क्लिक करा आणि मुक्तपीठच्या वेबसाइटला भेट द्या.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अॅंड कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स अॅंड टेलिकम्युनिकेशन/ टेलिकम्युनिकेशन/ कम्युनिकेशन/ मेकॅनिकल/ सिव्हिल या विषयात बीई/ बीटेक असणे आवश्यक आहे.
- ट्रेनी इंजिनीअर-१ या पदासाठी १ वर्षांचा अनुभव तर, प्रोजेक्ट इंजिनीअर-१ या पदासाठी २ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
ट्रेनी इंजिनीअर-१ या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २८ वर्षांपर्यंत तर, प्रोजेक्ट इंजिनीअर-१ या पदासाठी ३२ वर्षांपर्यंत वय असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. तर, पद क्र.१ साठी जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून १७७ रूपये शुल्क आकारले जाणार आणि पद क्र.२ साठी जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून ४७२ रूपये शुल्क आकारले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://www.bel-india.in/ वरून माहिती मिळवू शकता.