मुक्तपीठ टीम
नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये वैद्यकशास्त्र तज्ज्ञ या पदासाठी १५ जागा, मेडिकल मायक्रोबायोलॉजिस्ट या पदासाठी ५ जागा, इंटेन्सिव्हिस्ट या पदासाठी १० जागा, कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी या पदासाठी १७५ जागा, स्टाफ नर्स या पदासाठी २०० जागा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी २० जागा, कनिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी १५ जागा, एएनएम या पदासाठी ४० जागा, बेडसाईड सहाय्यक या पदासाठी ४० अशा एकूण ५२० पदांवर भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २ एप्रिल २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) पद क्र.१- एमडी (मेडिसीन)
२) पद क्र.२- एमडी (मायक्रोबायोलॉजी)
३) पद क्र.३- i)एमडी/ डीएनबी एमईडी/ क्रिटीकल केएर / चेस्ट + आयडीसीसीएम / एमबीबीएस, डीए /एमबीबीएस, डीटीसीबी + आयडीसीसीएम ii)२-३ वर्षे अनुभव
४) पद क्र.४- एमबीबीएस / बीएएमएस/ बीएचएमएस/ बीयूएमएस
५) पद क्र.५- i)१२वी उत्तीर्ण ii) जीएनएम किंवा बीएससी (नर्सिंग)
६) पद क्र.६- एमएससी (मॉलिक्यूलर बायोलॉजी/बायोटेक्नॉलॉजी/जेनेटिक्स/बायो केमिस्ट्री/मायक्रोबायोलॉजी) किंवा बीएससी+डीएमएलटी
७) पद क्र.७- i) १२वी उत्तीर्ण ii)डीएमएलटी/ सीएमएलटी कोर्स.
८) पद क्र.८- i) १२वी उत्तीर्ण ii) एएनएम
९) पद क्र.९- बेड साईड सहाय्यक कोर्स किंवा १२वी उत्तीर्ण+२ वर्षे अनुभव किंवा ओटी टेक्निशिअन आयटीआय असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ५० वर्षांपर्यंत असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइट https://www.nmmc.gov.in/navimumbai/ वरून माहिती मिळवू शकता.