मुक्तपीठ टीम
मिलिटरी इंजिनीअर सर्व्हिसमध्ये ड्राफ्ट्समन पदासाठी ५२ जागा, सुपरवाइजर (बी/एस) पदासाठी ४५० जागा अशा एकूण ५०२ जागांची भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार १२ एप्रिल २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. आर्किटेक्चरल असिस्टंटशिप, अर्थशास्त्र किंवा वाणिज्य शाखेतील पदवीधरांसठी ही मोठी सधी आहे.
या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) पद क्र.१- आर्किटेक्चरल असिस्टंटशिप मध्ये डिप्लोमा २) पद क्र.२- अर्थशास्त्र किंवा वाणिज्य किंवा आकडेवारी / व्यवसाय अभ्यास किंवा सार्वजनिक प्रशासन पदव्युत्तर पदवी + १ वर्ष अनुभव किंवा अर्थशास्त्र किंवा वाणिज्य किंवा आकडेवारी / व्यवसाय अभ्यास किंवा सार्वजनिक प्रशासनात पदवी + मटेरियल मॅनेजमेन्ट / वेअरहाउसिंग मॅनेजमेन्ट/ खरेदी / लॉजिस्टिक / सार्वजनिक खरेदी मध्ये डिप्लोमा+ २ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १२ एप्रिल २०२१ पर्यंत १८ ते ३० वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या जनरल, ओबीसी उमेदवारांकडून १०० रूपये शुल्क आकारले जाईल, तर एससी, एसटी, पीडब्ल्यूडी, ईएक्सएसएम आणि महिला उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी मिलिटरी इंजिनीअर सर्व्हिसच्या अधिकृत वेबसाइट https://mes.gov.in/वरून माहिती मिळवू शकता.