मुक्तपीठ टीम
आयडीबीआय बँकेत ‘बँक मेडिकल ऑफिसर’ पदाची भरती आहे. ही भरती २३ जागांसाठी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार २० फेब्रुवारी २०२१ संध्याकाळी ४ वाजेपर्यंत अर्ज करू शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता
सामान्य प्रॅक्टिशनर म्हणून एमबीबीएस पदवी आणि किमान ०५ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
०९ फेब्रुवारी २०२१ रोजी ६५ वर्षापर्यंत असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्यांसाठी कोणतेही शुल्क आकारलेले नाही.
अधिक माहितीसाठी आयडीबीआय बँकेच्या अधिकृत वेबसाइट https://www.idbibank.in/index.asp वरून माहिती मिळवू शकता.
पाहा व्हिडीओ: