मुक्तपीठ टीम
वाशिम रोजगार मेळावा अंतर्गत टेक्निशियन, अॅप्रेंटिस ट्रेनी, डाटा इंजिनीअर,ऑपेरशन मॅनेजर, एनएपीएस ट्रेनी/ असोसिएट्स, टुल अॅंड डाई मेकर, ट्रेनी, मशीन ऑपरेटर, एक्झिक्युटिव्ह, एलआयसी एजंट अॅंड सेल्स एक्झिक्युटिव्ह या पदांवर एकूण २१५हून अधिक जागांसाठी करिअर संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २९ डिसेंबर २०२२ पर्यंत अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण पुणे, औरंगाबाद, मुंबई, वाशिम आणि जळगाव आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १०वी/ १२वी उत्तीर्ण/ आयटीआय/ डिप्लोमा/ पदवीधर असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय किती वर्षांपर्यंत असावे हे नमूद करण्यात आलेले नाही आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही कारण, ही भरती वाशिम रोजगार मेळावा अंतर्गत होणार आहे.
मेळाव्याचे ठिकाण
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मंगरूळपीर, जिल्हा- वाशिम आहे.
अधिक माहितीसाठी महास्वयमच्या अधिकृत वेबसाइट https://rojgar.mahaswayam.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.
नोकरीची लिंक
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/12NUTSsHnuHeLi5mppEQd-WRM2fDA55LM/view








Subscribe