मुक्तपीठ टीम
बृहन्मुंबई महानगरपालिकेत वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, प्रशिक्षित अधिपरिचारिका या पदांसाठी एकूण २०७० जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २६ जून २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) पद क्र.१- एमडी (मेडिसिन/ॲनस्थेसिया)/ डीएम (कार्डिओलॉजी/न्यूरोलॉजी)
२) पद क्र.२- एमबीबीएस/ बीएएमएस/ बीएचएमएस
३) पद क्र.३- १) १२वी उत्तीर्ण २) जीएनएम असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ३३ वर्ष असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अर्ज पाठविण्यासाठी ई-मेल आयडी-
covid19mcgm@gmail.com / stenodeanl@gmail.com
अधिक माहितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइट https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous वरून माहिती मिळवू शकता.