मुक्तपीठ टीम
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनमध्ये मोठी भरती आहे. कंपनीने इंजिनिअर पदासाठी अर्ज मागवले आहेत. मॅकेनिकल इंजिनिअर १२० पदे, सिव्हिल इंजिनिअर ३० पदे, इलेक्ट्रिकल इंजिनिअर २५ पदे, इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअर २५ पदे अशी एकूण २०० पदे आहेत. पात्र आणि ईच्छुक उमेदवार १५ एप्रिल २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठची www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता
• या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार आयसीटीई मान्यताप्राप्त / यूजीसी मान्यताप्राप्त विद्यापीठ / डीम्ड विद्यापीठातून ४ वर्षांचा नियमित इंजिनीअरिंग कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
• ओबीसी-एनसी / ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी किमान ६०% गुण
• एससी / एसटी / पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी किमान ५०% असणे आवश्यक आहे.
शुल्क
• या पदासाठी अर्ज करणाऱ्या एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून शुल्क आकारले जाणार नाही.
• यूआर, ओबीसीएनसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून ११८० रूपये शुल्क आकारले जाणार.
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइट http://jobs.hpcl.co.in/Recruit_New/ वरून माहिती मिळवू शकता.
पाहा व्हिडीओ: