मुक्तपीठ टीम
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी सुवर्णसंधी आहे. संजय गांधी पोस्टग्रॅज्युएट इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये मेडिकल आणि नॉन मेडिकल पदांसाठी भरती निघाली आहे. एकूण १६५ रिक्त जागांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या पदांसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २५ जानेवारी पासून सुरु झाली असून १४ फेब्रवारी २०२२ पर्यंत ऑनलाईन अॅप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी कालावधी दिला आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून संबंधित विषयात डिप्लोमा केलेला असावा. तसेच पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ४० वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
अनारक्षित, ओबीसी आणि EWS श्रेणीतील उमेदवारांना ११८० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना ७०८ रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.
अधिक माहितीसाठी संजय गांधी पोस्टग्रॅज्युएट इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या अधिकृत वेबसाइट sgpgims.org.in वरून माहिती मिळवू शकता.
पाहा व्हिडीओ:
https://youtu.be/SJL4i3l9dfk








Subscribe