मुक्तपीठ टीम
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेमध्ये आरोग्य सेवेतील डॉक्टर, नर्स, टेक्निशियन, वॉर्डबॉय अशा विविध पदांच्या १५३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १५ एप्रिल २०२१ रोजी सकाळी ११.३० वाजता आहे. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
१) वैद्यकीय अधिकारी (MBBS)- एमबीबीएस
२) वैद्यकीय अधिकारी- बीएएमएस / बीएचएमएस /बीयूएमस
३) स्टाफ नर्स- जीएनएम/ बी.एससी (नर्सिंग)
४) ANM- एएनएम कोर्स
५) फार्मासिस्ट- बी.फार्म/ डी.फार्म
६) वॉर्ड बॉय- ८ वी उत्तीर्ण
७) एक्स-रे टेक्निशियन- १) १०वी उत्तीर्ण २) एक्स-रे टेक्निशियन कोर्स
८) ECG टेक्निशियन- १) १० उत्तीर्ण २) इसीजी टेक्निशियन कोर्स
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास कोणत्याही वयोमर्यादेची अट नाही.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइट https://bncmc.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.
पाहा व्हिडीओ: