मुक्तपीठ टीम
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ग्रंथालय संचालक, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय सेवा, गट-अ या पदासाठी १ जागा, कला संचालक, कला संचालनालय, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ या पदासाठी १ जागा, संचालक माहिती, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, गट-अ या पदासाठी १ जागा अशा एकूण ३ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २५ जून २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) पद क्र.१- १) कला, विज्ञान, विधी किंवा वाणिज्य विषयात पदव्युत्तर पदवी २) ग्रंथालय विज्ञान पदवी किंवा डिप्लोमा ३) १० वर्षे अनुभव
२) पद क्र.२- १) ललित कला किंवा व्हिज्युअल आर्ट प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी २) १७ वर्षे अनुभव
३) पद क्र.३- १) पत्रकारिता विषयातील पदवी किंवा कला शास्त्र वाणिज्य विधी विषयातील पदवी +पत्रकारिता विषयातील डिप्लोमा २) ७ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
पद क्र.१ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ४० वर्ष, पद क्र.२ साठी १८ ते ५० वर्ष, पद क्र.३ साठी १८ ते ५० वर्ष असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून ७१९ रूपये शुल्क आकारले जाणार तर, इतर उमेदवारांकडून ४४९ शुल्क आकारले जाणार.
अधिक माहितीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाइट https://mpsc.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.