मुक्तपीठ टीम
फेसबुक मेटाव्हर्समध्ये पहिल्या भारतीय लग्नाचे आभासी रिसेप्शन होणार आहे. तामिळनाडूचे दिनेश एसपी आणि नागनंदिनी रामास्वामी यांनी ही वेगळी संकल्पना लढवली. त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये विशेष सजावटीची गरज नाही. पण लग्नसोहळा दिसेल जगातली सर्वात वेगळा आकर्षक असा. कोरोना काळात पाहुण्यांच्या प्रचंड गर्दी जमवणे टाळण्यासाठी या दांपत्याने डोके लढवले. त्यांनी त्यांचे लग्नानंतरचे रिसेप्शन आभासी वास्तवाचे नवीन जग असलेल्या फेसबुकच्या मेटाव्हर्समध्ये आयोजित केले आहे. भारतातील मेटाव्हर्सवर होणारा हा पहिला विवाहसोहळा असेल. नागनंदिनी यांचे दिवंगत वडीलही या कार्यक्रमात अवतार रूपात सहभागी होणार आहेत.
दिनेशच्या या अनोख्या रिसेप्शनच्या कल्पनेला नागनंदिनीने उत्साहाने स्वीकारले. मेटाव्हर्स हे ३डी डिजिटल जग आहे. जिथे ऑगमेंटेड रिअॅलिटी, व्हर्च्युअल रिअॅलिटी आणि ब्लॉक चेन तंत्रज्ञान सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून दिले जाते. येथे वापरकर्ते स्वतःचे बनावट अवतार तयार करून एकमेकांना भेटू शकतात आणि संवाद साधू शकतात. नागनंदिनी यांचे दिवंगत वडीलही याचमुळे येथे उपस्थित राहू शकतील. त्यांच्या चित्रांच्या आधारे त्यांचा अवतार तयार करण्यात येणार आहे.
हॉगवॉर्टच्या महालावर आयोजित रिसेप्शनची थीम
- वधू-वर हे हॅरी पॉटरचे चाहते आहेत, त्यामुळे हॉगवॉर्ट महालावर रिसेप्शनची थीम ठेवण्यात आली आहे.
- कृष्णगिरीतील शिवलिंगपुरम येथे ६ फेब्रुवारीला लग्न आटोपून परतताना दोघेही लॅपटॉपवर पारंपरिक पोशाखात अवतार परिधान करून रिसेप्शनला येतील.
- नातेवाइकांना सामील होण्यासाठी एक लिंक आणि पासवर्ड देण्यात आला आहे, ज्यावरून ते त्यांचा अवतार निवडतील.
- सर्व अवतार एकमेकांना भेटण्यास आणि संवाद साधण्यास सक्षम असतील.
- व्हाउचर किंवा गुगल पेद्वारे भेटवस्तू देखील दिल्या जातील. परंतु येथे सर्वात महत्त्वाचे म्हणजे अन्न मिळणार नाही.
कोरोना महामारीमुळे कार्यक्रमाची आधुनिक कल्पना
- क्रिप्टोकरन्सी इथिरियमचे माइनिंग करणारे दिनेश आयआयटी मद्रासमध्ये प्रकल्प सहयोगी आहे आणि त्याची होणारी पत्नी नागनंदिनी सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे.
- दिनेश आणि नागनंदिनीची भेट ही इंस्टाग्रामवर झाली.
- कोरोना महामारी आणि लॉकडाऊनने त्यांना मेटाव्हर्सवर रिसेप्शनची कल्पना आली जेणेकरून जास्त लोक त्यात सहभागी होऊ शकतील आणि संसर्ग पसरणार नाही.
- त्यांनी क्वाटिक्स टेक या अॅप डेव्हलपमेंट स्टार्टअपच्या विघ्नेश सेल्वाराजशी संपर्क साधला, ज्यांनी या अनोख्या स्वागताची सर्व तयारी केली.
पाहा व्हिडीओ: