मुक्तपीठ टीम
बिग बॉसच्या १३ व्या पर्वाचा विजेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनामुळे त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. वयाच्या अवघ्या ४०व्या वर्षी सिद्धार्थने अखेरचा श्वास घेतला आहे. त्यामुळे कमी वयातील हृदयविकाराची कारणं जाणून घेणं महत्वाचे आहे. त्यातही इतर अनेक कारणांबरोबरच ड्रग व्यसनाधिनता आणि त्यातून होणारा ओव्हरडोस घात करत असल्याचेही सांगितले जाते. अशा धोक्यांपासून सावध राहण्यासाठी काही महत्वाची माहिती:
कमी वयात का वाढत आहेत हृदयविकाराच्या समस्या?
- हृदयविकाराचा झटका वृद्धांनाच येतो असं पूर्वी मानलं जात असे.
- परंतु आता तरुणांमध्ये, विशेषतः महिलांमध्ये ह्रदयविकाराच्या समस्या वेगाने वाढत आहेत.
- एका अभ्यासानुसार ३४ ते ५४ वयोगटातील लोकांमध्ये हृदयविकाराचा दर २७ टक्क्यांवरून ३२ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
तरुणाईच्या हृदयविकाराची मुख्य कारणे
- कमी वयातील हृदयविकाराच्या समस्यांचं मूळ हे आपल्या जीवनशैलीत असतं.
- दारु, सिगारेटचे व्यसन, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉलची पातळी, शारीरिक हालचालींचा अभाव, मधुमेह आणि योग्य आहार न घेणे, ही प्रमुख कारणे आहेत.
- योग्य पोषक आहाराऐवजी पिझ्झा-बर्गर आणि अन्य फास्ट फूडकडे कल वाढला आहे.
- थंडपेयं, उत्तेजकं, एनर्जी ड्रिंक यांचं व्यसन म्हणावी एवढी सवयही घातक ठरते.
रक्तदाब कमी करा
- सामान्य रक्तातील साखरेच्या पातळीपेक्षा किंचित जास्त तरूणांमध्ये हृदयरोगाचा धोका वाढू शकतो.
- म्हणूनच वर्षातून एकदा तरी तुमचा रक्तदाब तपासणे महत्वाचे आहे.
- जर तुमचा रक्तदाब १२०/८० पेक्षा जास्त असेल तर तुम्ही ते गांभीर्याने घ्या आणि तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात ठेवा
- उच्च रक्तदाबाप्रमाणे, वयाच्या चाळीशीमध्ये उच्च कोलेस्टेरॉलची पातळी देखील तुमच्या हृदयविकाराचा आणि स्ट्रोकचा धोका वाढवते.
- शारीरिक व्यायामाचा अभाव, साखरयुक्त आणि जंकफूड हे देखील या गंभीर आजाराचे कारण आहेत.
- जीवनशैली आणि आहारातील बदल सहसा उच्च कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात आणू शकतात.
दररोज व्यायाम करा, चालणे वाढवा!
- जर केवळ आहार आणि शारीरिक हालचालीमुळे तुमचे कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होत नसेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- तसेच दररोज व्यायाम करणे आवश्यक आहे.
- जेवढं चालता येईल तेवढं चाला. त्याबद्दल मार्गदर्शन घ्या
- साधे सोपे शारीरिक हालचाली घडवणारे सोपे व्यायाम करा.
- कार्यालयात अथवा घरी काम करतानान किमान काही तासांच्या अंतराने पायी चाला.
लठ्ठपणा हेही धोका वाढण्याचे कारण
- लठ्ठपणामुळे धोका वाढतो एवढं नक्की.
- २० ते ३९ वयोगटातील प्रौढांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण वाढत असून ते हृदयरोगचे प्रमुख कारणं ठरत आहे.
- आहारावर योग्य नियंत्रण, योग्य आहार, योग्य वेळी आहार ही त्रिसुत्री फायद्याची ठरु शकते.
- जेवल्यानंतर लगेच झोपणे हेही घातक ठरू शकते.
धुम्रपान करू नये
- धूम्रपानामुळे श्वासोच्छवासाच्या समस्या आणि फुफ्फुसांचा कर्करोग होतो.
- धूम्रपान करणाऱ्यांना हृदयरोग होण्याची शक्यता दोन ते चार पट जास्त असते.
ताण-तणाव कमी करा
- सध्याच्या व्यावसायिक स्पर्धेच्या काळात ताण-तणाव अपरिहार्य झाले आहेत.
- तरुण वयातही व्यावसायिक अथवा वैयक्तिक जीवनातील स्पर्धपोटी ताण-तणाव वाढू शकतात.
- यामुळे शरीरावर कितीही नाही म्हटलं तरी सुप्त दुष्परिणाम होऊ लागतात.
- तरुण वयातच अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
- तणावामुळे उच्च रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलची पातळी, वाढते.
- यामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो.
ड्रगचं व्यसनही घात करतं!
- तरुण वयात पार्टी कल्चर किंवा ग्लॅमर जगात सतत ऊर्जादायी एनर्जेटिक दाखवण्याचा हव्यास असतो.
- काही वेळी तसं दिसणं ही व्यावसायिक गरजही सांगितली जाते.
- केवळ फॅशन, टीव्ही, चित्रपट उद्योगातच नाही तर आता कॉर्पोरेट सेक्टरमध्येही ऊर्जावान असणं ही अतिरिक्त गुणवत्ता नाही तर आवश्यक बाब मानली जाते.
- त्यात पुन्हा पब पार्ट्या किंवा शरीर संबंधांमध्येही जास्त जोश दाखवण्याचं फॅड दिसत आहे.
- त्यासाठी काही चुकीच्या सल्ल्याने तात्पुरता जोश भरणाऱ्या ड्रगचा मार्ग निवडतात.
- त्याची सवय लागली की ते शरीराला पोखरतात. त्यातून आणखी गरज भासते. आणखी वाढत गेलेली ही गरज काहीवेळी ड्रगचा ओव्हर डोस घडवते.
- ड्रगच्या ओव्हर डोसमधूनही ह्रद्याचा घात होऊ शकतो.
- अनेक अभिनेते, मॉडेल, कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह अशा ड्रगबाजीच्या आहारी जातात. त्यातून कमी वयातच अंत ओढवतो.