Sunday, May 11, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

भारतातून ‘रेडी टू इट’ खाद्य उत्पादन निर्यातीत १२ टक्के वाढ! आता ३९४ दशलक्ष डॉलर्सवर!

February 1, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
ready to eat

मुक्तपीठ टीम

ठरवलं आणि प्रामाणिक परिश्रम घेतले तर अशक्य काही नसतं. सध्या भारतातील अन्न प्रक्रिया उद्योग अशाच प्रयत्नांची गोड फळं चाखत आहे. भारतातील अन्न प्रक्रिया उद्यागात रेडी टू इट(आरटीई), रेडी टू कूक (आरटीसी) आणि रेडी टू सर्व्ह (आरटीएस) या खाद्य उत्पादनांचा मोठा वाटा आहे. अपेडा अर्थात कृषी आणि प्रक्रिया केलेले खाद्यान्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण बास्केटअंतर्गत या उत्पादनांच्या निर्यातीसाठी सातत्यानं प्रयत्न करत असते. त्यामुळे ग्राहकांसाठी तयार खाद्यपदार्थ उत्पादनांच्या निर्यातीत गेल्या एक दशकात लक्षणीय वाढ झाली आहे. भारतातून ‘रेडी टू इट’ खाद्य उत्पादनांची निर्यात गेल्या दहा वर्षात १०%नी वाढून ३९४ दशलक्ष डॉलर्सवर पोहचली आहे.

 

🇮🇳India’s exports of ready to eat products up by 24% to $394 million in 2021-22 (April-October) as compared to 2020-21 (April-October).

Major RTE export items include biscuits & confectionery, Indian sweets & snacks, and breakfast cereals.

Read More📰: https://t.co/0nlI3SeQeD pic.twitter.com/jhmGxRePVs

— Dept of Commerce, GoI (@DoC_GoI) January 31, 2022

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने निर्यातीसाठी उत्पादनांच्या मूल्यवर्धनावर भर दिल्याने, ‘रेडी टू इट’ प्रकारातील खाद्यपदार्थ उत्पादनांनी गेल्या एका दशकात 12 टक्के चक्रवाढ वार्षिक वाढ दर (सीएजीआर) नोंदवला आहे.आणि याच कालावधीत अपेडा (APEDA) निर्यातीतील आरटीईचा हिस्सा 2.1 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

 

2011-12 ते 2020-21 या कालावधीत रेडी टू इट (आरटीई), रेडी टू कुक (आरटीसी) आणि रेडी टू सर्व्ह (आरटीएस) या प्रकारातील खाद्यपदार्थ उत्पादनांच्या निर्यातीत 10.4 टक्के चक्रवाढ वार्षिक वाढ दर (सीएजीआर) नोंदवण्यात आला आहे. भारताने 2020-21 मध्ये 2.14 अब्ज डॉलर्सपेक्षा पेक्षा जास्त किंमतीच्या तयार खाद्यपदार्थ उत्पादनांची निर्यात केली.तयार खाद्यपदार्थ उत्पादने वेळेची बचत करणारी आणि सहज उपलब्ध होत असल्याने, आरटीई ,आरटीसी आणिआरटीएस या प्रकारातील खाद्यपदार्थांची मागणी अलीकडच्या काळात अनेक पटींनी वाढली आहे.

आरटीई, आरटीसी आणिआरटीएस या प्रकारातील खाद्यपदार्थ उत्पादनांची निर्यात एप्रिल- ऑक्टोबर (2020-21) मधील 823 दशलक्ष डॉलर्सच्या  तुलनेत एप्रिल – ऑक्टोबर (2021-22) मध्ये 23% पेक्षा जास्त वाढून 1011 दशलक्ष डॉलर्स झाली आहे.हे लक्षात घेता, मागील तीन वर्षातील आरटीई /आरटीसी आणि आरटीएस या प्रकारातील खाद्यपदार्थांची निर्यात खालील आलेखामध्ये दर्शविण्यात आली आहे.

स्रोत : डीजीसीआयएस

रेडी टू सर्व्ह  (आरटीएस)  प्रकारातील खाद्यपदार्थांनी  २०१८-१९ मध्ये ४३६ दशलक्ष डॉलर्स, २०१९-२० मध्ये  ४६१दशलक्ष डॉलर्स आणि २०२०-२१ मध्ये ५११ दशलक्ष डॉलर्स इतकी निर्यात नोंदवली.

 

‘रेडी टू ईट’ खाद्यपदार्थ प्रकाराअंतर्गत समाविष्ट असलेल्या उत्पादनांमध्ये बिस्किटे आणि मिठाई, गूळ, धान्यापासून तयार केलेला नाश्ता, वेफर्स, भारतीय मिठाई आणि अल्पोपहार, पान मसाला आणि सुपारी इत्यादींचा समावेश आहे.२०२०-२१ मधील ‘रेडी टू ईट’ खाद्यपदार्थ निर्यातीत बिस्किटे आणि मिष्टान्न  तसेच  भारतीय मिठाई आणि अल्पोपहाराचा ८९% इतका मोठा वाटा आहे.

 

२०२०-२१ या वर्षात साधारणपणे ५६% पेक्षा अधिक ‘रेडी टू इट’ खाद्यपदार्थ आघाडीच्या १० निर्यातदार देशांमध्ये निर्यात करण्यात आले. अमेरिका हा तयार खाद्यउत्पादनांच्या चारही प्रकारांच्या निर्यातीत सर्वात पुढे आहे.

 

२०२०-२१ मध्ये ‘रेडी टू इट’ खाद्यउत्पादनांची मुख्य़ निर्यात करणाऱ्या देशांचे तपशील, अमेरिका १८.७३, संयुक्त अरब अमिरात (८.६४%), नेपाळ (५%), कॅनडा (४.७७%), श्रीलंका (४.४७%), ऑस्ट्रेलिया (४.२%), सुदान (२.९५%), ब्रिटन (२.८८%), नायजेरिया (२.३८%), सिंगापूर (२.०१%).

 

‘रेडी टू इट’ खाद्यउत्पादनांच्या वाढीचा एकूण वार्षिक दर गेल्या  दशकात ७ टक्केनी वाढता राहिला. याच कालावधीत कृषी व प्रक्रिया खाद्य उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (अपेडा) च्या  एकूण निर्यांतीमध्ये ‘रेडी टू इट’ खाद्यउत्पादनांच्या निर्यातीचे प्रमाण १.८टक्क्यांवरून २.७टक्क्यांवर गेले आहे.  ‘रेडी टू इट’ खाद्यउत्पादने या श्रेणीखाली येणारे मुख्य पदार्थ म्हणजे फक्त शिजवून तयार होणारे खाद्यपदार्थ, पापड, पीठे व दळलेले पदार्थ, पावडर व स्टार्च.  या पदार्थांचे  निर्यातीमधील प्रमाण याप्रमाणे,  रेडी-टू-कूक ३१.६९%, पापड ९.६८%, पीठे व दळलेले पदार्थ ३४.३४% तसेच पावडर व स्टार्च २४.२८%.

 

२०२०-२१ मध्ये खाद्य़उत्पादनांचे प्रमुख निर्यातदार देश आहेत, अमेरिका १८.६२दशलक्ष अमेरिकन डॉलर्स,  मलेशिया (११.५२ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स), संयुक्त अरब अमीराती (८.५७दशलक्ष अमेरिकन डॉलर्स), इंडोनेशिया (७.५२दशलक्ष अमेरिकन डॉलर्स), ब्रिटन (७.३३दशलक्ष अमेरिकन डॉलर्स), नेपाळ (५.८९दशलक्ष अमेरिकन डॉलर्स), कॅनडा (४.३१ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स), ऑस्ट्रेलिया ( ४.२ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स), बांग्लादेश (३.४३ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) आणि कतार (USD २.७६दशलक्ष अमेरिकन डॉलर्स).

 

कृषी आणि प्रक्रिया केलेल्या खाद्यउत्पादनांच्या निर्यातीमधील मोठी वाढ ही कृषी व प्रक्रिया खाद्य उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (अपेडा)ने घेतलेल्या मेहनतीचे फळ आहे. यामध्ये भारतीय वकिलातीच्या सक्रिय सहभागाने वेगवेगळ्या देशांमध्ये लागोपाठ लावली गेलेली प्रदर्शने, उत्पादनवैशिशी सुसंगत वा इतर विपणन मोहिमांद्वारे नव्या संभाव्य  बाजारपेठांची चाचपणी करण्यात आली.

 

कृषी व प्रक्रिया खाद्य उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (अपेडा)ने भारतातील नोंदणीकृत कृषी उत्पादने व  खाद्य उत्पादने यांच्या भौगोलिक मानांकनांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्यासाठी महत्वाच्या निर्यातदार देशांमधून  दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून खरेदीदार व विक्रेते यांच्या बैठकांचे आयोजन केले होते.

 

खात्रीशीर दर्जा आणि निर्यातीसाठीच्या उत्पादनांचे खात्रीशीर दर्जा प्रमाणपत्र यासाठी कृषी व प्रक्रिया खाद्य उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने उत्पादने व निर्यातीसाठीची उत्पादने यांच्या विस्तृत श्रेणीच्या परिक्षणाच्या सुविधा भारतभरात २२०प्रयोगशाळांमधून उपलब्ध केल्या.

 

कृषी व प्रक्रिया खाद्य उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने  निर्यातक्षम खाद्यउत्पादनांच्या परीक्षणांसाठी व अवशिष्ट निरिक्षणांसाठी असलेल्या मान्यताप्राप्त प्रयोगशाळांचे अपग्रेडेशन (/आधुनिकीकरण) व सुसज्जता याकडेही लक्ष पुरवले. पायाभूत विकासासाठी आर्थिक सहायता योजनांतर्गत सहाय्य, दर्जा सुधारणा व कृषी उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी बाजारपेठेचा विकास याबाबतीतही कृषी व प्रक्रिया खाद्य उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण सहाय्य करते.

India’s exports of RTE, RTC & RTS (USD million)

2018-19 2019-20 2020-21 2020-21

(April-October)

2021-22 (April-October)
Ready to Eat (RTE) 766 825 1043 352 394
Ready to Cook (RTC) 473 368 560 206 282
Ready to Serve (RTS) 436 461 511 265 335

Source: DGCIS

 

पाहा व्हिडीओ:


Tags: food productiongood newsIndiaIndia Food Processing IndustryMinistry of Commerce and Industrymuktpeethready to eatआरटीएसखाद्य उत्पादनचांगल्या बातम्याभारतभारत अन्न प्रक्रिया उद्योगमुक्तपीठरेडी टू इटवाणिज्य आणि उद्योग मंत्रालय
Previous Post

दर्याच्या राजांना खास भेट, मत्स्यव्यवसाय पायाभूत सुविधांसाठी निधी, डिझेल परतावाही!

Next Post

सिंगल चार्जमध्ये चांगली रेंज देतात टाटा-महिंद्रांच्या ‘मेड इन इंडिया’ ईलेक्ट्रिक कार

Next Post
Tata-Mahindra

सिंगल चार्जमध्ये चांगली रेंज देतात टाटा-महिंद्रांच्या 'मेड इन इंडिया' ईलेक्ट्रिक कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!