मुक्तपीठ टीम
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियांने महाराष्ट्रातील आणखी एका बँकेवर मोठी कारवाई केली आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक बँकांवर कारवाई होत आहे. आतापर्यंत अनेक बँकांवर कारवाई झाल्यानंतर आता त्यात अहमदनगर येथील म्युनिसिपल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची भर पडली आहे. आर्थिक स्थितीत गडबड झाल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.रिझर्व्ह बँकेने या बँकेवर अनेक निर्बंध लादले आहेत, त्यापैकी एक म्हणजे ग्राहकांना १० हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही.
काय आहेत निर्बंध?
- नगर सहकारी बँक आरबीआयची मंजुरी घेतल्याशिवाय कोणत्याही कर्जाचे नूतनीकरण किंवा पेमेंट करू शकत नाही.
नवीन कर्ज देऊ शकत नाही. - म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक कोणतीही गुंतवणूक करू शकत नाही.
- कोणतेही दायित्व पूर्ण करू शकत नाही.
- कोणतेही पेमेंट जारी करू शकत नाही.
- तसेच ही सहकारी बँक आरबीआयकडून सूचना मिळाल्याशिवाय तिच्या कोणत्याही मालमत्तेची विल्हेवाट लावू शकत नाही.
- रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांनुसार, बचत बँक खाते किंवा चालू खात्यात जमा केलेल्या एकूण रकमेपैकी १०,००० रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही.
निर्बंध पुढील सहा महिन्यांसाठी कायम
- रिझर्व्ह बँकेने बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट १९४९ अंतर्गत ही कारवाई केली.
- आरबीआयच्या या सूचनेनंतर निर्बंधांचा कालावधी पुढील ६ महिन्यांसाठी कायम राहणार आहे, जो ६ डिसेंबरपासून लागू झालाय.
- रिझर्व्ह बँकेच्या निवेदनानुसार, ६ महिन्यांनंतर सहकारी बँकेच्या स्थितीचे मूल्यांकन केले जाईल आणि पुढील सूचनांचा विचार केला जाईल.
- सर्व काही सुरळीत झाले तर निर्बंधात शिथिलता येईल, अन्यथा परिस्थिती जैसे थेच राहील.
बँक निर्बंधांसह व्यवसाय सुरू ठेवणार
- नगर सहकारी बँक निर्बंधांसह व्यवसाय सुरू ठेवणार असल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटलेय.
- त्याची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत ही बंदी कायम राहील.
- भविष्यातील आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन नवीन सूचनाही जारी केल्या जाऊ शकतात.
- नियम शिथिल करता येतील, असेही बँकेने म्हटले आहे.
- हे सर्व बँकेच्या आर्थिक स्थितीवर अवलंबून असेल.
महाराष्ट्रातील निर्बंधाखालील बँकांची वाढती यादी
- बुलडाणा – मलकापूर अर्बन को ऑप बँक
- पुणे – शिवाजीराव भोसले बँक
- सोलापूर- लक्ष्मी सहकारी बँक
- रायगड – कर्नाळा सहकारी बँक
- जालना – मंठा अर्बन को ऑप बँक
- सातारा – कराड जनता बँक (आधी निर्बंध, दिवाळखोरीनंतर परवानाही रद्द )
- उस्मानाबाद- वसंतदादा नागरी सहकारी बँक
- लातूर- डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकरअर्बन बँक