Sunday, March 8, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“जोगेश्‍वरी गुंफेवरील रहिवाशी पात्र-अपात्रतेच्या घोटाळ्याची चौकशी करा”

रवींद्र वायकरांची मनपा आयुक्तांकडे मागणी

June 17, 2021
in घडलं-बिघडलं
0
Ravindra Waikar

मुक्तपीठ टीम

जोगेश्वरी पूर्वेमधील जोगेश्‍वरी गुंफा परिसरातील पात्र-अपात्र झोपडीधारक ठरवून त्यांचे पुनर्वसन करताना मनपाच्या इमारत व परिक्षण विभागाकडून नियमांचे उल्लंधन व आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. या घोटाळ्याची सखोल चौकशी करुन येथील झोपडीधारकांना न्याय द्यावा, अशी मागणी जोगेश्‍वरी विधानसभाचे शिवसेनेचे आमदार तसेच माजी राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी मुंबई मनपाचे आयुक्त चहल तसेच के पूर्वचे सहाय्यक आयुक्त यांच्याकडे केली आहे.

ही मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे. जोगेश्‍वरी पूर्व  येथे जोगेश्‍वरी गुंफा ही पुरातन वास्तु आहे. २००४ साली दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीनुसार उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार मुंबईत चार टप्प्यात विविध ठिकाणी या गुंफेवरील ४१३ कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात आहे. झोपडीधारकांचे पुनर्वसन करतान पात्रता व अपात्रता याद्या तयार करण्याचे काम इमारत व परिरक्षण विभागाने करतेवेळी अनेक नियमांचे उल्लंघन व आर्थिक गैरव्यवहार केल्याचे निदर्शनास आले आहे. अद्यापपर्यंत प्रसिद्ध केलेल्या दोन याद्यानुसार एकुण ५२४ निवासी व अनिवासी गाळे बाधित झाले असून अजुनही १० ते १५ निवासी घरे मिसिंग असल्याचे उच्च न्यायालयाच्या सुचनेनुसार या घरांचे कागदोपत्री पुरावे तपासून पात्रता निश्‍चित करण्यास मनपा प्रशासनास निर्देश दिले. याचा फायदा घेत येथील काही झोपडी दलालांनी स्थानिक मनपा प्रशासनाच्या संगनमताने घरांची संख्या वाढवून आपला अहवाल सादर केला त्यात एक मजली खोल्या, एका घराचे दोन भाग करुन आणि पुनर्वसित केलेल्या झोपड्यांच्या जागी पुन्हा नवीन झोपड्या बांधून त्यांची संख्या या पुनर्वसनात मिसिंग म्हणून दाखविण्यात आली. असे करण्यामागे मनपाच्या संबंधित विभागीय कार्यालयातील काही अधिकारी असल्याची माहिती मिळत असल्याचे, वायकर यांनी आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात नमुद केले आहे.

 

२०१७ नंतर या पुनर्वसन प्रक्रियेत सर्वेक्षणात मिसिंग असलेल्या घरांना न्याय मिळावा यासाठी कागदपत्रांची तपासणी करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते. येथील घरांची यादी करताना झोपडी क्रमांक १५ ते ७० अशा एकुण ६५ घरांची यादी स्वत: चाळ मालकाने २००८ मध्ये दिली होती. मात्र याच चाळ मालकाने २००९ साली ७१ खोल्या असल्याचे पत्र कोणत्या आधारावर दिले, असा प्रश्‍न वायकर यांनी पत्राच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.

 

येथील मिसिंग केसमध्ये मुळ झोपडीधारकांनी त्यांच्याकडे असलेल्या मूळ घरांची कागदपत्रे, त्यात फेरफार केलेली कागदपत्रे, पुर्वी विकलेल्या खोल्यांची कागदपत्रे मिसिंग घरांच्या पात्रतेसाठी वापरली आहेत. या कागदपत्रांची सत्यता कोणत्याही सेवा संस्थांकडून पडताळणी केलेली नसल्याचे वायकर यांनी पत्राच्या माध्यमातून आयुक्तांच्या निदर्शनास आणले आहे. गुंफेजवळ असणार्‍या अनिवासी गाळ्याबाबत अजुनही प्रशासनाने धोरण ठरविले नसल्याचे ते पुनर्वसनापासून वंचित असून यातील काही गाळे अनिवासी गाळे म्हणुन दाखविण्यात आले आहेत. या पुनर्वसनात काही खोल्या या शाळेसाठी वर्गखोल्या होत्या, त्याबाबत अजुनही धोरण ठरविण्यात आले नसल्याचे निदर्शनास आणून वायकर यांनी येथील रहिवाशांची पात्र-अपात्रतेची यादी तयार करताना अधिकार्‍यांनी केलेल्या घोटाळ्याची सखोल चौकशी करण्यात यावी, असे रविंद्र वायकर यांनी मनपा आयुक्त व के पूर्वचे सहाय्यक आयुक्त यांना पाठविलेल्या पत्रात नमुद केले आहे.


Tags: BMCJogeshwariravindra waikarShivsenaजोगेश्‍वरी गुंफारविंद्र वायकर
Previous Post

मुंबईकरांना खरंच हायटेक एसी लोकल हवीय?

Next Post

प्रदिप शर्मांना एनआयएकडून अटक…ब्रेकफास्टनंतर ताब्यात, लंचनंतर गजाआड!

Next Post
Pradeep sharma

प्रदिप शर्मांना एनआयएकडून अटक...ब्रेकफास्टनंतर ताब्यात, लंचनंतर गजाआड!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!