मुक्तपीठ टीम
गुजरात निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान गुरुवारी झालं. या टप्प्यात ८९ जागांवरील मतदान २०१७पेक्षा कमी झाले. मतदारांचा निरुत्साह पाहून भाजपाने चक्क मतदारांना प्रेरणा देत उत्साह संचारण्यासाठी शिवसेनेची मदत घेतली. क्रिकेटर रवींद्र जडेजाने हिंदुहृदयसम्राट दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात बाळासाहेब ठाकरेंनी गुजरातींना इशारा दिला होता, ‘नरेंद्र मोदी गेले ते पण गुजरातला गेले’ असे ठाकरे यांनी त्या व्हिडिओमध्ये म्हटले होते. मात्र, गुजरातमधील या प्रचार फंड्यावर महाराष्ट्रात वेगळी प्रतिक्रिया उमटत आहे. यामुळे एकप्रकारे मोदींच्या फोटोवर शिवसेना उमेदवार जिंकल्याच्या भाजपाच्या दाव्यांना परस्पर उत्तर मिळाल्याची प्रतिक्रिया युवा सेनेचे नेते अॅड. जयेश वाणी यांनी व्यक्त केली आहे.
Abhi bhi time hai samaj jao gujaratiyo🙏🏻 #respect #balasahebthackeray pic.twitter.com/bwjO3Jj7iq
— Ravindrasinh jadeja (@imjadeja) November 30, 2022
जडेजांच्या ट्वीटने मोदींपेक्षा बाळासाहेब गरजेचे हे दिसल्याची चर्चा…
- रवींद्र जडेजाच्या पत्नी रिवाबा या गुजरातमधील उत्तर जामनगर मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवार आहेत.
- काल मतदान सुरू होण्याच्या काही तासांपूर्वी जडेजाने त्याची पत्नी आणि भाजपाला विजयी करण्याचे आवाहन करतानाचा बाळासाहेबांचा जुना व्हिडिओ शेअर केला.
- ठाकरेंचा व्हिडिओ शेअर करण्यासोबतच जडेजाने मतदारांना एका सिंहाचं ऐका, अजून वेळ आहे, गुजराती मतदारांनों समजून घ्या’ असा कॅपशन लिहीला आहे.
- त्या व्हिडीओमध्ये बाळासाहेब ठाकरे असे म्हणत आहेत की, ‘मला एवढेच सांगायचे आहे की नरेंद्र मोदी गेले तर गुजरात गेला!’.
खरंतर बाळासाहेबांचे हे उद्गार गुजरात दंगलीच्या आरोपांमुळे नरेंद्र मोदींना हटवू पाहणाऱ्या भाजपाच्या राष्ट्रीय नेतृत्वाला इशारा देणारे होते, पण भाजपा आता मतदारांना प्रेरणा देण्यासाठी बाळासाहेबांचा तो व्हि़डीओ वापरत आहे.
मोदी जी से काम नही बन रहा तो ठाकरे जी कि याद आई 😡
— शैलेश पाटील (@sshailesh123) December 1, 2022
एकप्रकारे शिवसेना फोडण्याचा आरोप असणारी भाजपा त्याच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वडिलांचा व्हिडीओ सत्ता राखण्यासाठी करताना दिसत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
That was very honest of you to accept the fact Jaddu. Maharashtra BJP needs a lesson from you. They are highly indebted by Hinduhridaysamrat Shivsena pramukh for there existence in Maharashtra. They started denying this well known fact after 2014.
— सौरभ (@SaurabhBG) November 30, 2022
यामुळे एकप्रकारे मोदींच्या फोटोवर शिवसेना उमेदवार जिंकल्याच्या भाजपाच्या दाव्यांना परस्पर उत्तर मिळाल्याची प्रतिक्रिया युवा सेनेचे नेते अॅड. जयेश वाणी यांनी व्यक्त केली आहे.
.@BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ShelarAshish बघा गुजरात मध्ये आजही बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने मतं मागीतले जातायत.
— Amit Bhadricha – अमित भाद्रीचा (@AmitBhadricha) December 1, 2022
जडेजांचं आवाहन पत्नीसाठी…
- १८२ जागांच्या गुजरात विधानसभेत ८९, ७८८ उमेदवारांपैकी रिवाबा एक आहेत.
- २०१७ च्या निवडणुकीत तेथून भाजपचे धर्मेंद्र सिंह जडेजा विजयी झाले होते.
- यावेळी रिवाबा जडेजांना उमेदवारी देत त्यांना तिकीट नाकारण्यात आली.
- मात्र, रिवाबाच्या ननंद आणि सासऱ्यांनी काँग्रेस उमेदवाराचा प्रचार केला.
- त्यांची ननंद नयनाबा जडेजा या काँग्रेसच्या आहेत.
…असं पहिल्यांदाच नाही – रिवाबा जडेजा
- कुटुंबात कोणतेही मतभेद नाही.
- एका पक्षाचे दोन सदस्य दोन भिन्न विचारधारेशी संबंधित असण्याची ही पहिलीच वेळ नाही, रिवाबा म्हणाल्या.
- ते माझे सासरे म्हणून नव्हे तर दुसऱ्या पक्षाचे कार्यकर्ता म्हणून बोलत आहेत.
- ही त्याची वैयक्तिक बाब आहे.
- जामनगरच्या जनतेवर माझा विश्वास आहे.
- जामनगरने माला अनेक गोष्टी दिल्या आहेत.
- माझ्या नवऱ्याचा जन्म इथेच झाला, त्याने इथूनच करिअरला सुरुवात केली.
- रवींद्र जडेजाने रिवाबाचा प्रचार केला आणि नरेंद्र मोदींची भेट घेतली.
जामनगर उत्तर मतदारसंघ
- सीमांकनानंतर २०१२ मध्ये मतदारसंघ निर्माण झाला आणि पहिल्यांदाच मतदान झाले.
- २०१२ मध्ये काँग्रेसचे धर्मेंद्र सिंह जडेजा या मतदारसंघातून निवडणूक जिंकले.
- पुढच्या निवडणुकीत त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.
- भाजपाने धर्मेंद्र सिंह यांना रिवाबा जडेजाच्या बाजूने उभे केले.
- जामनगर उत्तरसह तीन जागांवर मतदानासाठी धर्मेंद्र सिंह यांना पक्षाचे प्रभारी बनवले गेले.