मुक्तपीठ टीम
संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मंत्रीपदाचा राजीनामा सोपवल्यानंतर माध्यमांशी बोलताना पूजा चव्हाण प्रकरणातील भाजपाचा गदारोळ हा त्यांचे आजवरचे काम आणि बंजारा समाजाची बदनामी करणारा असल्याचा आरोप केला.
माझ्या वैयक्तिक जीवनावर या बदनामीचा परिणाम झाला. मला नाहत त्रास दिला गेला. आमच्या बंजारा समाजाच्या पूजा चव्हाण हिच्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणी माझी, बंजारा समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न भाजपाने केला असा त्यांनी आरोप केला.
शेण खाताना जात आठवत नाही?
भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी समाजाला ढाल करून स्वत: शेण खाऊ नये. ते खायचे मग समाजाला पुढे करायचे हे योग्य नाही. तसेच गुन्हेगाराला जात नसते, हेच माझे मत आहे.