Tuesday, May 13, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

जगावं तर टाटांसारखं! वागावं तर टाटांसारखं! ‘भारत रत्न’ ट्रेंड रोखणारी टाटांची नम्रता!

February 6, 2021
in featured, सरळस्पष्ट
0
जगावं तर टाटांसारखं! वागावं तर टाटांसारखं! ‘भारत रत्न’ ट्रेंड रोखणारी टाटांची नम्रता!

सरळस्पष्ट / तुळशीदास भोईटे

 

सध्या शेतकरी आंदोलनात केवळ सत्तेच्या कृपेसाठी लाळघोटेपणा करत देशहिताचा आव आणल्यामुळे सचिनपासून अनेक सेलिब्रिटी वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. आयपीएलमध्ये जसा लिलाव असतो तसाच स्वार्थासाठी स्वत:वरील कोट्यवधींच्या प्रेमाचाच लिलाव पुकारणाऱ्यांच्या गर्दीत रतन टाटांचं हे वागणं मनाला भावणारं. मनाला जिंकणारं. एक भारतीय म्हणून त्यांनी कितीही नाही म्हटलं तरी आमच्यासाठी तेच सर्वोत्तम भारतरत्न हे कोटी कोटी भारतीयांच्या मनात कोरणारंच!

 

उद्योगपती रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची मागणी जोर पकडू लागली आहे. त्यात एक कारण शेतकरी आंदोलनाचे समर्थन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींना भारतरत्न सचिन तेंडुलकरपासून अनेक सेलिब्रिटींनी विरोध केल्याची नाराजीही असेल. ही मागणी अधिकच जोर धरत असतानाच स्वत: रतन टाटा यांनी मात्र नम्रतेनं निवेदन केले आहे ते ही मागणी करणारी मोहीम थांबवण्याचे! हेच आहे टाटांचे मोठेपण…अधिकच विश्वास कमवणारं. ब्रँडला अधिक विश्वसनीय बनवणारं!!

 

टाटा समूह हा स्थापनेपासूनच भारत आणि भारतीयांच्या हितासाठी कार्यरत राहिला आहे. उद्योग असल्यानं स्वाभाविकच नफा हा उद्देश असतोच. पण केवळ तेवढाच उद्देश न राखता देशासाठी काही वेगळं करण्याचा, तसे करताना नफ्या-तोट्याचा विचार समोर न ठेवण्याचे धोरण टाटा समूहाने नेहमीच अवलंबिले आहे.

 

Celebrating the spirit of self-reliance, we are proud of our weavers who, with the help of Antaran honed their entrepreneurial skills to support their families during the national lockdown. On behalf of these artisans, their communities and Antaran, we thank you for your support. pic.twitter.com/f71vqAV6OQ

— Tata Trusts (@tatatrusts) June 19, 2020

स्वातंत्र्यपूर्व काळात भारताला पोलाद निर्मितीत आत्मनिर्भर बनवणारा टाटा समूह नंतर इतरही अनेक क्षेत्रात भारताला घडवण्यासाठी योगदान देत राहिला. सध्या रतन टाटा या उद्योगाची धुरा सांभाळतात. सत्तेत कुणीही असलं तरी टाटा अपवाद वगळता नको त्या राजकीय भानगडीत पडत नसल्याने ते कधीच सत्तेच्या वेगळ्या कृपेचे लाभार्थी ठरले नाहीत. तरीही कधी नॅनोसारखी जगातील सर्वात स्वस्त कार बनवून तर कधी कोरोना संकटात आरोग्य सेवकांना चौरस आहार पुरवून टाटा आपली जबाबदारी पार पाडत आले. टाटांचे अनेक क्षेत्रातील समाजकार्य व्यावसायिक दर्जाचे असते पण काडीचीही अपेक्षा न बाळगणारे. त्यातूनच एक प्रतिमा मनात ठसते ती टाटांच्या वेगळेपणाची. समर्पित सेवाभावाची. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे टाटा म्हणजे विश्वास अशी!

देशासाठी देता येईल तेवढं योगदान…तेही कसलीही अपेक्षा न ठेवता देणाऱ्या रतन टाटांना भारत रत्न दिला जावा, असे मत ट्विटरवर मोटिव्हेशनल स्पीकर डॉ. विवेक बिंद्रा यांनी व्यक्त केले होते. त्यासाठी त्यांनी #BharatRatnaForRatanTata ही हॅशटॅग मोहीमही सुरु केली. त्यानंतर ट्विटरवर तो भारतातील सर्वाधिक ट्रेंडिंग हॅशटॅग ठरला.

Inspiring the young achievers, Ratan Tata says that believing in one`s ability is essential to achieve success in life.
We confer the country`s highest civilian award Bharat Ratna for Ratan Tata.
Join us in our campaign #BharatRatnaForRatanTata #RequestByDrVivekBindra pic.twitter.com/6JUgrZAL6o

— Dr. Vivek Bindra (@DrVivekBindra) February 5, 2021

 

खरंतर अशा यशस्वी मोहिमेसाठी उद्योगजगत, सेलिब्रिटी, राजकारणी कोट्यवधी रुपये मोजतात. रतन टाटांना भारत रत्न देण्याच्या मागणीसाठी मात्र ट्विटरकर आपोआप एकवटले. इतर कुणी असतं तर हवेतच गेलं असतं. पण ज्यांच्यासाठी ती मोहीम चालली ते खरंच त्यासाठी लायक असे रतन टाटा आहेत, त्यांनी आज शांतपणे एक ट्विट केलं. तेही त्यांच्या नेहमीच्या विनम्र शालिन शैलीत.

 

रतन टाटा यांनी लिहिलं…
“एका पुरस्कारासंदर्भात समाजमाध्यमातील एका वर्गाने व्यक्त केलेल्या भावनांचा मी आदर करतो. पण माझी नम्र विनंती आहे की त्यासाठीची मोहीम थांबवण्यात यावी. त्यापेक्षा, स्वत: भारतीय असणं, भारताच्या प्रगती आणि भरभराटीत वाटा उचलण्याचा प्रयत्न करणे मला भाग्याचे वाटतं”

While I appreciate the sentiments expressed by a section of the social media in terms of an award, I would humbly like to request that such campaigns be discontinued.

Instead, I consider myself fortunate to be an Indian and to try and contribute to India’s growth and prosperity pic.twitter.com/CzEimjJPp5

— Ratan N. Tata (@RNTata2000) February 6, 2021

 

रतन टाटांसारखं जगावं म्हटलं ते त्यांच्या जराही अहंकार नसलेल्या, बडेजाव नसलेल्या साध्या जीवनपद्धतीमुळे. एकदा माझी पत्नी अॅड. अनिता उच्च न्यायालयातील काम संपल्यानंतर फोर्टच्या फॅब इंडियात गेली होती. तिची अचानक नजर गेली आणि तिला धक्काच बसला. कारण समोर रतन टाटा अगदी एखाद्या साध्या ग्राहकासारखे कपडे पाहत होते. तिच्या अभिवादनालाही त्यांनी नम्रतेनं स्वीकारलं आणि उत्तरही दिलं. ज्यांच्या जीवावर निवडून येतात, त्यांच्याकडे नंतर गाडीच्या काचा खाली करूनही न पाहण्याची गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या अनेकांमधील प्रस्थापित प्रवृ्त्ती आणि जगातील सर्व काही शक्य असतानाही माणूस म्हणून जगण्याची शैली. खरंच जगावं ते टाटांसारखंच!

 

pic.twitter.com/sFwcDyxcgA

— Ratan N. Tata (@RNTata2000) June 3, 2020

तसंच आता एवढा मोठा ट्विटर ट्रेंड झाला तरी स्वत:च पुढे येऊन थांबवण्याचे मोठेपणही टाटांचेच! त्यांचे हे वागणे अधिकच भावते ते त्यांनी भारतीय असणं, भारतासाठी काही करण्याची संधी मिळणं यामुळे स्वत:ला भाग्यशाली म्हटल्यामुळे!

 
Ratan tata bharat ratna

सध्या शेतकरी आंदोलनात केवळ सत्तेच्या कृपेसाठी लाळघोटेपणा करत देशहिताचा आव आणल्यामुळे सचिन तेंडुलकरसह अनेक सेलिब्रिटी वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. आयपीएलमध्ये जसा लिलाव असतो तसाच स्वार्थासाठी स्वत:वरील कोट्यवधींच्या प्रेमाचाच लिलाव पुकारणाऱ्यांच्या गर्दीत रतन टाटांचं हे वागणं मनाला भावणारं. मनाला जिंकणारं. एक भारतीय म्हणून त्यांनी कितीही नाही म्हटलं तरी आमच्यासाठी तेच सर्वोत्तम भारतरत्न हे कोटी कोटी भारतीयांच्या मनात कोरणारंच!

(तुळशीदास भोईटे हे मुक्तपीठ या मुक्त माध्यम उपक्रमाचे मुख्य संपादक आहेत – संपर्क ९८३३७९४९६१)


Tags: bharatratna for ratan tata in marathiratan tataभारत रत्नमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकररतन टाटारतन टाटांना भारतरत्नसचिन तेंडुलकर
Previous Post

स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून नाशिक-औरंगाबाद महामार्गावर चक्का जाम

Next Post

#मुक्तपीठ शनिवारचे ‘टॉप-१० व्हायरल बुलेटिन’

Next Post
Muktpeeth Top 10 News

#मुक्तपीठ शनिवारचे 'टॉप-१० व्हायरल बुलेटिन'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!