मुक्तपीठ टीम
मुंबई मनपाच्या घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाच्या डोळ्या खालचा भाग उंदराने कुरतडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात हा प्रकार घडला आहे. याप्रकरणामुळे अती दक्षता विभागातील दक्षतेचे वाभाडे निघाले आहेत. याप्रकाराबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत महापौर किशोरी पेडणेकर यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
- राजावाडी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या श्रीनिवास यल्लपा या २४ वर्षीय रुग्णाच्या बाबतीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
- दोन दिवसांपूर्वी त्याला राजावाडी पालिका रुग्णालयात दम लागत असल्याने दाखल केले होते.
- तळमजल्यावर असलेल्या अतिदक्षता विभागात या रुग्णावर उपचार सुरू आहेत.
- रुग्णाची प्रकृती आधीच नाजूक आहे तसेच तो बेशुद्धावस्थेत आहे.
- असे असतानाच रुग्णाच्या डोळ्या खालचा भाग चक्क उंदराने कुरतडल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
- श्रीनिवास याच्या डोळ्यांतून रक्त येत असल्याचे नातेवाईकांना दिसले. उंदराने त्याचे डोळे कुरतडल्याचा त्यांना संशय आला.
- याबाबत त्यांनी रुग्णालयातील नर्सला सांगितले असता त्यांनी त्यांना उद्धट उत्तरे दिल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.
- त्यानंतर डॉक्टरांना याबाबत माहिती देण्यात आली असता त्यांनी तपासणीनंतर उंदराने डोळ्या खालच्या भागाचा उंदराने चावा घेतला असावा, असे दिसत असल्याचे सांगितले.
- रुग्णालयाच्या अधिष्ठाता विद्या ठाकूर यांनीही उंदराने डोळ्या खालचा भाग कुडतडल्याचे सांगितले आहे.
महापौरांचे कारवाईचं आश्वासन!
- राजावाडी रुग्णालयातील या धक्कादायक प्रकाराची गंभीर दखल महापौर किशोरी पेडणेकर यांनी घेतली आहे.
- संबंधित रुग्णाच्या डोळ्याच्या पापण्या आणि आजूबाजूचा भाग उंदराने कुरतडल्याचे दिसत आहे.
- “रुग्णाची परिस्थिती चांगली नाहीये.
- हा प्रकार घडायला नको होता.
- आम्ही यासंदर्भाच आवश्यक ती कारवाई करू”, असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं आहे.
डॉक्टरांनी काय म्हटलं?
- दरम्यान, या सगळ्या प्रकारावर रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. विद्या ठाकूर यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.
- उंदराने डोळ्याचा खालचा भाग कुरतडला आहे.
- त्याच्या डोळ्याला कोणतीही इजा झालेली नाही.
- ज्या ठिकाणी हा प्रकार घडला, तो वॉर्ड ग्राउंड फ्लोअरला आहे.
- लोक वारंवार सांगून देखील रुग्णालय परिसरामध्ये कचरा टाकत आहेत.
- या कचऱ्यामुळेच कदाचित तिथे उंदीर आले असतील.