मुक्तपीठ टीम
पंढरीची वारी म्हणजे सामाजिक समतेचा एक उत्कृष्ट अविष्कार आहे. जात, धर्म, पंथ, प्रांत, स्त्री-पुरुष सर्व भेद विसरून माणूस म्हणून सर्वजण एक झाल्याचे तिथे पहायला मिळते. संतांनी दिलेल्या मानवतावादी विचारांचा जागर या वारीमध्ये होत असतो. या विचारांशी जोडून घेण्यासाठी विविध परिवर्तनवादी विचारांचे लोक “एक दिवस तरी वारी अनुभवावी” असे म्हणत गेली काही वर्षे या वारीत सहभागी होत आहेत. गेली दोन वर्षे कोरोनामुळे सामुहिक वारी होऊ शकली नाही. आपल्याला वारीत जाता आले नाही, पण घरी बसून वारीचा अनुभव घेण्यासाठी, संत विचारांचा जागर तर झालाच पाहिजे म्हणून वारीच्या निमित्ताने ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे.
१० जूलै २०२१ ते १७ जूलै २०२१ रोजी दररोज संध्याकाळी ६ वाजता होणाऱ्या या व्याख्यान मालेत. संत साहित्याचे अभ्यासक, वारकरी कीर्तनकार आपले विचार मांडणार आहेत. सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन संत विचारांचा वारसा समजून घ्यावा.
ज्ञानदीप लावू जगी व्याख्यानमाला
फेसबुक आणि झूम वर दररोज संध्याकाळी ६ वाजता
शनिवार, १० जुलै २०२१
६ ते ६.१० – “एक दिवस तरी वारी अनुभवावी” या संकल्पनेची माहिती देतील – शरद कदम, कार्याध्यक्ष- राष्ट्र सेवा दल, मुंबई.
६.१० – मुख्य वक्त्याचे व्याख्यान.
विषय – संत साहित्य, समग्र परिवर्तनाचा विचार
ह.भ.प. डॉ. राजेश मिरगे
अध्यक्ष: शर्मिष्ठा भोसले,पत्रकार
रविवार, ११ जुलै २०२१
विषय: हरिपाठ-एक आनंदवाट
ह.भ.प. डॉ. लता पाडेकर
अध्यक्ष : संदीप काळे, पत्रकार, सकाळ
सोमवार, १२ जुलै २०२१
विषय : पंढरीची वारी आहे माझे घरी
ह.भ.प. तुळशीराम महाराज लबडे
अध्यक्ष: युवराज मोहिते, पत्रकार.
मंगळवार, १३ जुलै २०२१
विषय : काय सांगू आता संताचे उपकार
हभप गणेश महाराज फरताळे
अध्यक्ष : उल्हास पाटील, गाथा परिवार.
बुधवार, १४ जुलै २०२१
विषय: याता याती धर्म नाही विष्णूदासा
ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज बंडगर
अध्यक्ष: ह.भ.प. डॉ. सुहास महाराज फडतरे.
गुरुवार, १५ जुलै २०२१
विषय : या रे या रे लहान थोर – ह.भ.प. सुनंदा भोस
अध्यक्ष: हरीष केंची, पत्रकार.
शुक्रवार, १६ जुलै २०२१
विषय : श्रमण परंपरा आणि वारकरी संत
डॉ. श्यामसुंदर मिरजकर
अध्यक्ष: मुकुंद कुळे, पत्रकार, महाराष्ट्र टाईम्स.
शनिवार, १७ जुलै २०२१
विषय : बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल – ह.भ.प. डॉ. रामेश्वर त्रिमुखे
अध्यक्ष : प्रा.सुभाष वारे
कार्यक्रमाचे सूत्र संचलन हभप श्यामसुंदर महाराज सोन्नर हे दररोज करणार आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक: 9892673047
9594999409.