मुक्तपीठ टीम
3D तंत्रज्ञान हे अनेक क्षेत्रात खूप उपयोगी ठरत आहे. नुकतीच एका १२ वर्षीय परदेशी मुलीवर दिल्लीत दुर्मिळ शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ही पीडित मुलगी प्रोग्रेसिव्ह स्कोलियोसिस डोर्सोलंबर या आजाराने त्रस्त होती. तिच्या उपचारासाठी ३डी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. प्रोग्रेसिव्ह स्कोलियोसिस डोर्सोलंबर या आजारामुळे तिचा पाठीचा कणा बराच वाकला होता. या त्रासामुळे, कमरेचा एक भाग दुसऱ्यापेक्षा मोठा होता. १३० अंशांपर्यंत तिला कुबड आले होते. दिल्लीत करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेत ते ३० अंशांनी कमी करण्यात आला आहे.
3D प्रिंटिंगने बनवलेल्या स्क्रूचा वापर
- ही मुलगी कझाकिस्तानच्या सीमेवरील किर्गिस्तान हा देशातील आहे.
- दिल्लीतील आकाश हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, मुलीची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत चालली होती.
- तीव्र वेदनांमुळे तिला चालताही येत नव्हते. यामुळे तिचे शरीर एका बाजूला झुकले.
- रुग्णालयात आल्यावर दोन टप्प्यात १६ तास मणक्याची शस्त्रक्रिया करण्यात आली.
- शस्त्रक्रियेचा पहिल्या टप्पा, जो १६ तास चालला होता, ६.त्यात कोरोनल प्लेनमध्ये अलाइनमेंट दुरुस्त करताना मणक्याची लवचिकता वाढवण्यासाठी मऊ ऊतक काढून टाकणे आणि अनेक हाडे कमी करणे समाविष्ट होते.
- त्याच वेळी, दुसऱ्या १० तासांच्या शस्त्रक्रियेमध्ये, ३डी प्रिंटेड जिग्सच्या मदतीने अनेक टायटॅनियम स्क्रू वापरण्यात आले.
मणक्याचे गंभीर आजार आणि स्क्रू घालण्यात मोठी जोखीम आहे. यासाठी ३डी प्रिंटिंग शस्त्रक्रिया सुरक्षितपणे करता येते. हाडाचा आकार मोजून सर्जिकल प्लॅनिंगमध्ये, ३डी प्रिंटिंगद्वारे स्क्रू लावले जातात. प्रत्येक टप्प्यावर ३डी प्रिंटिंग, स्क्रूचा आकार, लांबी आणि दिशा ठरवण्यात मदत करते. शस्त्रक्रियेनंतर, सुमारे ७० ते ८० टक्के आलेले कुबड दुरुस्त करण्यात यश येते.