मुक्तपीठ टीम
पृथ्वीच्या पोटात तब्बल ६६० किमी खोलात मिळालेला एक हिरा शास्त्रज्ञांसाठी मोलाचा ठेवाच नाही तर पृथ्वीच्या जडणघडणीचा इतिहास सांगणारा ज्ञानमार्ग ठरणार आहे. दक्षिण आफ्रिकेतील बोत्सवानात हा हिरा सापडला आहे. त्या हिऱ्यात डेवमॉयट हे खनिज नवे सापडले आहे. त्याच्या माध्यमातून पृथ्वीच्या स्तरांमध्ये नेमके काय होते, याचा शोध लागण्याची शक्यता आहे. हा हिरा १० कोटी ते १५० वर्षे या दरम्यान असण्याची शक्यता आहे.
पृथ्वीतल हा एक असा ग्रह आहे जो सर्व गोष्टींनी परिपूर्ण आहे. त्यावर जैविक आणि अजैविक घटक आहेत. या पृथ्वीतलावरील प्रत्येक घटक महत्त्वाचा मानला जातो. काही वेळेस प्रश्न पडतो की, जमिनीखाली काय आहे? शास्त्रज्ञ म्हणतात की, पृथ्वीखाली पाणी, खनिजे आणि हिरे आहेत. पण आता पृथ्वीच्या खाली काय आहे हे पूर्णपणे कळण्याची शक्यता आहे. शास्त्रज्ञांना पृथ्वीच्या पृष्ठभागावरुन एक हिरा सापडला आहे. त्या हिऱ्यात असलेले खनिज आजवर माहित नसलेले आहे.
शास्त्रज्ञांच्या हाती एक उत्तम यश
- या हिऱ्यामुळे पृथ्वीचा तळ काय आहे हे शोधता येईल.
- या हिऱ्याला डेव्हमोइट असे नाव देण्यात आले आहे.
- हे उच्च-दाब कॅल्शियम सिलिकेट पेरोव्स्काइटपासून बनलेले आहे.
- त्याची रचना क्रिस्टलीय स्वरूपाची आहे, ज्यामुळे पृथ्वीचा घन थर बनतो. यामुळे शास्त्रज्ञांच्या हाती मोठे यश मिळाले आहे.
- हा हिरा जमिनीच्या ६६० किमी खाली आढळला आहे.
- दक्षिण आफ्रिकेतील बोत्सवाना येथे शास्त्रज्ञांनी याचा शोध लावला आहे.
- या हिऱ्यात डेव्हमोइट नावाचे नवीन खनिज सापडले आहे.
- याद्वारे आता पृथ्वीच्या पृष्ठभागावर नेमके काय आहे हे शोधता येणार आहे.
लॉस वेगसमधील नेवाडा विद्यापीठातील खनिजशास्त्रज्ञ ऑलिव्हर त्सचुनर यांनी हा शोध विज्ञानासाठी महत्त्वाचा असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, हा हिरा पृथ्वीच्या वर आणला तर तो सहज तुटू शकतो. येथे दाब तीव्रपणे कमी होतो, जसा तो हिऱ्याच्या आत असतो. ही हिरा सध्या सुरक्षित आहे. हा हिरा १५० वर्षांपूर्वीचा असू शकतो.