मुक्तपीठ टीम
पंजाब विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान काल कॉंग्रेसचे सर्वेसर्वा राहुल गांधी यांनी अमरिंदर सिंह यांनी गरिबांना वीज मोफत देण्यास नकार दिल्याने मुख्यमंत्री पदावरून हटवल्याचे विधान केले आहे.
महाराष्ट्रात ठाकरे यांनी निवडणुकीत विचारपूर्वक वीजबिल सवलतीचे आश्वासन दिले होते. गेले दोन वर्षे किमान कोरोना काळात वीजबिल माफी करा असा आग्रह करीत आम आदमी पार्टीने महाराष्ट्रात विविध ठिकाणी आंदोलने केली आहेत. त्यानंतर ‘महाराष्ट्रातील कॉंग्रेसचेच मंत्री असलेले नितीन राउत यांनी ऐन दिवाळीपूर्वी वीजबिल माफीची घोषणा केली होती पण लगेचच यु टर्न घेतला. त्यामुळे पंजाबचाच न्याय महाराष्ट्राला लावत राहुल गांधी यांनी उर्जामंत्री नितीन राउत यांचा राजीनामा घ्यावा व ही सर्व जुमलेबाजी नसून, गरिबांचा कळवळा खरा असल्याचे दाखवून द्यावे’ असे आवाहन आम आदमी पार्टीचे राज्य अध्यक्ष रंगा राचुरे यांनी केले आहे .
पंजाब मध्ये खाजगी वीज कंपन्याशी अमरिंदर सिंह यांचे हितसंबंध होते असेही राहुल गांधी यांनी सांगितले आहे. तसेच काही हितसंबंध महाराष्ट्रात या महाविकास सरकारच्या आड येत आहेत का?, अशी वीजबिल माफी केल्यास शिवसेनेलाही दिल्या वचनाला जागल्याचे समाधान मिळेल, अशी खोचक प्रतिक्रिया आप चे अध्यक्ष राचुरे यांनी दिली आहे.