मुक्तपीठ टीम
शिवसेनेत असताना मुख्यमंत्री राहिलेल्या नारायण राणे यांनी पक्ष सोडल्यानंतर ते जिथं गेले तिथं तिथं शिवसेनेविरोधातच लळढत राहिले. आताही त्यांनी भाजपामधून शिवसेनेशी सामना सुरुच ठेवला आहे. दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत या प्रकरणांचा उल्लेख करीत सीबीआय, ईडी कारवाईच्या धमकीनंतर आता शिवसेनेकडून त्यांच्या मुंबई आणि मालवणमधील बंगल्यांवरच कारवाईचा हातोडा मारण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं कळतं. मुंबईतील जुहूमधील बंगल्याला महानगरपालिकेची तर मालवणमधील बंगल्याला सीआरझेडची नोटीस आल्याचे कळते.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण चिवला बीचवरील ‘निलरत्न’ बंगल्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता यावरून भाजपा आणि शिवेसेना वाद आणखी चिघळणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेला नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले. यामुळेच हा वाद आणखी पेटण्यास सुरुवात झाली.
मुंबई महापालिकेने नारायण राणे यांच्या जुहू येथील अधिश बंगल्याची पाहणी करण्यासाठी नोटीस दिली होती. अधिश बंगल्याच्या पाहाणी नाट्यानंतर नीलरत्न बंगल्याला ही कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. नारायण राणेंच्या अधिश बंगल्याच्या पाहणीचा वाद ताजा असताना निलरत्न बंगल्याला ही कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर हल्लाबोल केला आणि पत्रकार परिषद घेऊन मातोश्री दोन अनधिकृत असल्याचे म्हटले.
नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना, मुख्यमंत्री आणि मातोश्रीवर टीका केली होती. या वक्तव्यामुळे आता पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नारायण राणे विरुद्ध शिवसेना वाद आणखी पेटणार का अशी चर्चा सध्या सुरु आहे. त्याचबरोबर भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज नागपूर कार्यालयाने महाराष्ट्र पोस्टल जीवन प्राधिकरणाला हे दिले आदेश दिले आहेत. प्रदीप भालेकर या माहिती अधिकार कार्यकर्त्याने नारायण राणे यांच्या मालवण येथील निलरत्न बंगला बांधताना सीआरझेड २ चे उल्लंघन झाले अशी तक्रार ऑगस्ट २०२१ रोजी केली होती. त्यानंतर तक्रारीची कॉपी आपल्याला मिळाल्याची माहिती माहिती भालेकर यांनी दिली आहे.