मुक्तपीठ टीम
बकरी ईद च्या पवित्र उत्सव दिनी मुस्लिम समाजाला मास्क आणि सोशल डिस्टन्स चे नियम पाळून ५० जणांना मस्जिद मध्ये नमाज पढण्याची परवानगी द्यावी या मागणी सह बकरी ईद बाबत विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवीत असल्याचे आश्वासन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मौलाना अब्दूर रशीद अन्सारी, मौलाना अमानुल्लाह खान, कारी ओवेस साहेब, मोहम्मद कलीम शेख, मुस्तफा अन्सारी यांच्या नेतृत्वात भेटलेल्या शिष्टमंडळाला दिले.
बकरी ईद साठी ऑनलाईन खरेदी ऐवजी बाजारात बकरी विक्री सुरू करावी; कुर्बानी साठी देवनार येथील पशुवधगृहात परवानगी द्यावी; प्रतिकात्मक कुर्बानी इस्लाम मध्ये मान्य नसून या पद्धतिचा नियम राज्य सरकार ने मुस्लिमांवर लादू नये, अशी मागणी मौलाना अब्दूर रशीद अन्सारी यांनी ना रामदास आठवले यांना निवेदन देऊन केली आहे.
मुस्लिम बांधवांच्या या मागण्यांसाठी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांना पत्र पाठविणार असल्याचे आश्वासन रामदास आठवले यांनी अन्सारी यांना दिले.