मुक्तपीठ टीम
मलिकांच्या घरी ईडीने जी कारवाई केली त्यावर राज्यातले राजकारण चांगलंच तापू लागले आहे. महाविकास आघाडीकडून ईडी आणि भाजपावर आरोप प्रत्योरोप केले जात आहेत. राजकिय सूडासाठी मलिकांवर ईडीची कारवाई केल्याचा आरोप आघाडीचे नेते करत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता भाजपा नेत्यांकडूनही प्रतिक्रिया येत आहेत. आमदार राम कदम यांनी ईडीची कारवाई व्यक्तीच्या विरोधात नाही वाईट कृत्याच्या विरोधात आहे, असं म्हटलं आहे.
ईडीची कारवाई व्यक्तीच्या विरोधात नाही वाईट कृत्याच्या विरोधात -राम कदम
- इडलीची कारवाई कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नाही तर त्या व्यक्तीने जर एखादी एखादी वाईट कृत्य केले असेल भ्रष्टाचार केला असेल तर त्या विरोधात आहे.
- राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांना ईडीच्या पथकाने आज सकाळी ताब्यात घेतले आहे.
- त्यांची चौकशी सुरू असून त्यांनी आंतरराष्ट्रीय डॉन दाऊद इब्राहिम याच्या साथीदाराची जमीन कवडीमोल भावात विकत घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
- देशद्रोहाच्या साथीदाराकडून जमीन विकत घ्यायची आणि चौकशी केली तर कांगावा करायचा हे योग्य नाही महाराष्ट्रातील जनता हे सर्व जाणून आहे.
- त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ईडीने चुकीची कारवाई केल्याचा कांगावा करू नये.
ज्यांना वाटतं हे सूडाचं राजकारण, त्यांना न्यायालय आहे-अतुल भातखळकर
- सूडाचं राजकारण कोण करतेय हे उभा महाराष्ट्र पाहतोय, असं अतुल भातखळकर यांनी म्हटलंय.
- नारायण राणे, नितेश राणे, किरीट सोमय्या यांच्या केसेस पाहिल्याचं ते म्हणालेत.
- नवाब मलिकांच्या ईडी कारवाईवरुन विचारण्यात आलेल्या प्रश्नावर अतुल भातखळकर बोलत होते.
- केंद्रीय यंत्रणांचा तपास कायद्याच्या कक्षेत राहून होत असतो.
- नवाब मलिकांना जर ईडीने बोलवल तर त्यांनी त्याची उत्तरे द्यावीत.
- माझ्या माहितीनुसार इक्बाल कासरकर पासून दाऊदच्या संबंधित अनेक लोकांनी त्यांचे व्यावसायिक संबंध आहेत, किंबहुना नवाब मलिक हे त्यांचे मित्र म्हणून वावरतात हे सुद्धा त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे त्याला उत्तर देतील.
- ईडी कायद्याच्या कक्षेत राहून काम करेल.
- मलिकांना मान्य नसेल तर न्यायालय आहेच, असंही ते म्हणालेत.
- दाऊदच्या संबंधित लोकांबरोबर मलिकांचे आर्थिक संबंध आहेत हे फडणविसांनी दोन महिन्यापूर्वी पत्रकार परिषद घेत पुराव्यासहित उघड केले.
- त्याच स्पष्टीकरण नवाब मलिक देऊ शकले नाही.
- ज्यांना असं वाटत की सुडाचं राजकारण आहे त्यांना न्यायालय आहे.
- चौकशीला का घाबरता, किरीट सोमय्या घाबरले नाहीत.