मुक्तपीठ टीम
सचिन वाझे चौकशी प्रकरणावरून महाविकास आघाडी आणि भाजप आमने सामने आली होती. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपने केली आहे. वाझे प्रकरणावरून भाजपाकडून होत असलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीसांनी अधिकारी नेमून मंत्र्यांवर पाळत ठेवल्याचा आरोप केला होता. यावर आता भाजप नेते राम कदम यांनी राष्ट्रवादीच्या आरोपाला उत्तर दिलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने आरोप केला आहे की, “देवेंद्र फडणवीस यांनी माहिती महासंचालकपदावर पोलीस खात्यातील, त्यातही सायबर गुन्हे शाखेच्या ब्रिजेश सिंह यांना आणून आपल्याच सरकारमधील मंत्र्यांवर पाळत ठेवण्याचे उद्योग केले होते. तेच आता पोलीस अधिकाऱ्यांच्या गैरवापरावर प्रवचने झोडत आहेत.”
राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप म्हणजे ‘शिळ्या कढीला ऊत‘ आहे.
एखादा अधिकारी आमच्या काळात नियुक्त झाला, म्हणजे तो पाळत ठेवणारा आणि मग तुमच्या काळात काय दहशतवादी कृत्य करायला, खंडण्या वसूल करायला अधिकारी नियुक्त केले का? https://t.co/jVcPuG11qy— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) March 19, 2021
राम कदमांचं प्रत्युत्तर
राष्ट्रवादी काँग्रेसच्या टीकेला भाजपाचे आमदार राम कदम यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप म्हणजे ‘शिळ्या कढीला ऊत’ आहे. एखादा अधिकारी आमच्या काळात नियुक्त झाला म्हणजे तो पाळत ठेवणारा आणि मग तुमच्या काळात काय दहशतवादी कृत्य करायला, खंडण्या वसूल करायला अधिकारी नियुक्त केले का?,” असा टोला राम कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला केला आहे.