मुक्तपीठ टीम
गेल्या काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या परतीच्या पावसामुळे जालनातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापसासह सर्वच पिकांची नासाडी झाली आहे. त्यामुळे अनेक राजकीय नेते नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. दरम्यान जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी देखील जालना जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. मात्र पाहणीसाठी आलेले अतुल सावे चक्क सजवलेल्या बैलगाडीतून पोहोचल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी अतुल सावे यांच्यावर टीका केली आहे.
अतुल सावेंची सजलेल्या बैलगाडीतून पाहणी…
- अतुल सावे यांनी बदनापूर तालुक्यातील बावणेपांगरी,अंबड तालुक्यातील सारंगपूर, हस्त पोखरी, हरतखेडा या गावांना पालकमंत्री यांनी भेट दिली.
- काही भागात प्रत्यक्ष बैलगाडीतून प्रवास करत त्यांनी पीक पाहणी केली.
- मात्र ज्या बैलगाडीतून त्यांनी पाहणी केली ती चक्क सजवलेली होती.
- त्यामुळे मंत्री पाहणीसाठी आले असतांना असा शाही थाट कशाला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
- त्यामुळे यावेळी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी देखील नाराजी व्यक्त केली.
पालकमंत्र्यांचा सजवलेल्या गाडीतील दौरा हा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार!!!
- राजू शेट्टी जालना जिल्ह्यातील वडिगोद्री येथे आले होते.
- त्यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली व नुकसानीची माहिती घेतली.
- पालकमंत्र्यांचा सजवलेल्या गाडीतील दौरा हा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची प्रतिक्रिया राजू शेट्टींनी दिली.
- जालना जिल्ह्यात अतिवृष्टीच्या यादीतून जालना जिल्ह्याला वगळलं आहे.
- आज जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतिवृष्टीच्या पाहणी करण्यासाठी सजवलेल्या बैलगाडीतून आले होते.
- सजवलेल्या बैलगाडीतून नेमकी वरात होती का पाहाणी दौरा हे मला माहीत नाही पण शेतकऱ्याला मदत करत तर नाही,किमान त्याच्या जखमेवर मीठ तरी चोळू नका, अन्यथा बळीराजा आसूड घेवून तुमच्या मागे लागल्याशिवाय राहणार नाही.