मुक्तपीठ टीम
मंत्री समितीने १५ ऑक्टोंबर पासून कारखाने सुरु करण्याचे आदेश दिले असले तरी पश्चिम महाराष्ट्रात मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची साखर परिषद झाल्याशिवाय ऊसाचे गाळप सुरु होत नाही असं शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी सरकारला सुनावलं आहे. स्वाभिमानी शेतरकरी संघटना दरवर्षी ऊस परिषद आयोजित करते. ऊस उत्पादक शेतकरी आणि इतर शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ही परिषद घेतली जाते. यंदा ही परिषद १९ ऑक्टोबरला जयसिंगपूर येथे होणार आहे. याचा अर्थ बहुसंख्य साखर कारखाने १९ ऑक्टोबरनंतरच सुरु होतील.
ऊस परिषदेत ऊस उत्पादक शेतकरी आणि पूरग्र्स्तांचे मुद्दे
- स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद ही जयसिंगपूर येथे पार पडणार आहे.
- १९ ऑक्टोंबरला या परिषदेला सुरवात होणार आहे.
- यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे तर प्रश्न असणार आहेतच शिवाय पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही वेळेत मदत देण्याची मागणी करण्यात येणार आहे.
- सरकारने त्वरीत मदत नाही केली तर एकाही मंत्र्याची दिवाळी गोड होऊ देणार नसल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.
राजू शेट्टींचा इशारा…अन्यथा आंदोलन!
- स्वाभिमानीच्या ऊस परिषदेमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांबरोबर इतर शेतकऱ्यांच्या प्रश्नाही हाताळले जाणार आहेत.
- सध्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
- त्यामुळे दिवाळीपूर्वीच सरकारने मदत करणे आवश्यक आहे.
- साखर कारखानदारांना यंदा चांगले दिवस आहेत. त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांची थकीत एफआरपी रक्कम देणे आवश्यक आहे.
- अन्यथा आंदोलन उभे केले जाणार.
आराधना शक्तिस्थळांची’ हे आंदोलन उभे केले जाणार
- एफआरपीची रक्कम ही शेतकऱ्यांना एकदम मिळणे आवश्यक आहे. तसा नियमही आहे.
- मात्र, केंद्र सरकार, राज्य सरकार आणि कारखानदार मिळून शेतकऱ्यांच्या हक्काचा पैसा देण्याचे धोरण ठरवतात हे चुकीचे आहे.
- यांच्यातील वाटाघाटीमध्ये शेतकऱ्यांचे मात्र, आर्थिक नुकसान होत आहे.
- १४ दिवसांच्या आतमध्ये एफआरपी रक्कम देणे बंधनकारक असताना कारखाने वर्षानुवर्षे शेतकऱ्यांचा हक्काचा पैसा वापरत आहे.
- एफआरपी रक्कम ही एकरकमी देणे हा नियम आहे.
- या रकमेतील तुकडे केले तर नवरात्रीपासून ‘जागर एफआरपीचा, आराधना शक्तिस्थळांची’ हे आंदोलन उभे केले जाणार आहे.
- राज्यातील विविध ठिकाणची शक्ति स्थळांची आराधना करुन दसऱ्याला जेजुरी येथे मेळाव्याद्वारे आंदोलनाची सांगता होणार आहे.