मुक्तपीठ टीम
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनाविरुद्ध खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांचा संघर्ष सुरु आहे. राणांनी तुरुंगाबाहेर येताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांच्याविरुद्ध लढण्याचे आव्हान दिले आहे. त्यावर शिवसेनेकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक राजू पेडणेकर यांनी देखील राणांवर खोचक शब्दात टीका केली आहे. अगोदर बबली बाईने माझ्या प्रभागात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढून दाखवावं, नंतर बाकीच्या गप्पा माराव्यात असे आव्हान त्यांनी केले आहे.
काय म्हणाले राजू पेडणेकर?
अगोदर बबली बाईने (नवनीत राणा) माझ्या प्रभागात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढून नगरसेवक बनून दाखवाव, नंतर बाकीच्या गप्पा माराव्यात! हे माझं आव्हान आहे, बंटी (रवी राणा) आणि बबली दोघांना,जय महाराष्ट्र!!
काय म्हणाले राणा?
- खासदार नवनीत राणा यांनी लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खुलं आव्हान दिले आहे.
- मी उद्धव ठाकरे यांना आव्हान देते की तुमच्यात दम असेल तर त्यांनी लोकांमध्ये यावं आणि लोकांमधून निवडून येऊन दाखवा.
- त्यांनी महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील मतदारसंघ निवडावा, मी त्यांच्याविरोधात उभी राहील आणि निवडून येऊन दाखवू.
- तेव्हा त्यांना जनतेची ताकद काय असते हे कळेल.