मुक्तपीठ टीम
लोकसभा निवडणूक २०२४ साठी भारतीय जनता पक्षाकडून नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील असे आता स्पष्ट आहे. पाटणा येथे झालेल्या भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान मोदींच्या उमेदवारीची घोषणा केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांसाठी एक प्रकारे इशाराच दिला. ते म्हणाले की, काही लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जागेवर पंतप्रधानपदी दुसऱ्या नेत्यांना पाहत आहेत. परंतु, ज्यांना असा विश्वास आहे की, विरोधकांनी २०२९ नंतरच हा विचार केला पाहिजे!
संरक्षण मंत्री म्हणाले की, “पंतप्रधान आज जगातील सर्वात लोकप्रिय नेता म्हणून उदयास आले आहेत. कारण, त्यांची संघटनात्मक क्षमता, लोकांशी जोडलेले आणि त्यांच्या अडचणींना समजून घेणे. ज्येष्ठ पत्रकार अजय सिंह यांच्या ‘द आर्किटेक्ट ऑफ द बीजेपी’ या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते म्हणाले, ‘लोकांशी जोडलेले राहा, यश तुमच्या पायांचे चुंबन घेईल… हे पंतप्रधानांचे ब्रीदवाक्य आहे. मोदींकडे जी संघटन क्षमता आहे ती दैवी शक्तीशिवाय शक्य नाही.”
२०२४मध्ये नाही तर, २०२९नंतर मोदींच्या पर्यायाचा विचार करा!
- काही लोक मोदींना पर्याय शोधत आहेत पण त्यांना तोड नाही. त्यांनी २०२९ नंतरच याचा विचार करायला हवा.
- मोदींनी केवळ निवडणुका जिंकण्यासाठी पक्षाचा विस्तार केला नाही, तर विचारधारा पसरवण्यासाठी आणि देशाची विचारसरणी बदलण्यासाठी पक्षाचा विस्तार केला, असे ते म्हणाले.
भारतातच नाही तर, जगात भारी मोदीजी!
- जनतेतील त्यांची लोकप्रियता, त्यांच्याशी संवाद, देशावरील मजबूत पकड, सामान्य माणसाच्या अडचणींबद्दलचे ज्ञान यामुळे देशातीलच नव्हे तर जगभरातील सर्वच नेत्यांना मागे टाकले आहे.
- आज ते जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत.
- अमेरिकन कंपनी ‘द मॉर्निंग कन्सल्ट’च्या सर्वेक्षणाचा संदर्भ देत संरक्षण मंत्री म्हणाले की, मोदींनी लोकप्रियतेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि ब्रिटनच्या पंतप्रधानांसह १२ प्रमुख राष्ट्रप्रमुखांना मागे टाकले आहे.
- मोदींनी जनतेशी भावनिक बंध निर्माण केला आहे. ते पंतप्रधान होण्यापूर्वी देशातील काही राज्यांमध्ये एनडीए नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स सरकार होते. आज त्याचा विस्तार १६ राज्यांमध्ये झाला आहे.
- सध्या देशभरात १३०० हून अधिक आमदार आणि ४०० हून अधिक भाजप खासदार आहेत.
- मोदींनी जातीय आणि प्रादेशिक सीमा, शहरी आणि ग्रामीण भारतातील अंतर कमी करून राजकारणाची मर्यादित व्याख्याही बदलली आहे.
- त्यांनी पंतप्रधानांची तुलना महाराजा जनक यांच्या राजवटीशी केली आणि त्यांनी देशात सामाजिक लोकशाहीचे संगोपन केल्याचे सांगितले.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, “मोदींच्या धोरणात्मक कौशल्याचा विकास प्रवास एका दिवसात झाला नसून, देशात वर्षानुवर्षे प्रवास करून त्यांनी जनतेला ओळखले आहे, देश समजून घेतला आहे, सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत आणि त्यांच्याशी संवाद साधला आहे. जात आणि वर्गाच्या सीमा तोडून त्यांनी पक्षाच्या विस्ताराचे एक मॉडेल तयार केले ज्याला तोड नाही, असे सांगून ते म्हणाले की, त्यांनी आपल्या प्रयोगातून भाजपला निवडणूक जिंकणाऱ्या मशीनमध्ये बदलले. विचारधारेशी तडजोड नाही आणि कामांचा वस्तुनिष्ठ आढावा हे त्यांच्या संघटनात्मक कौशल्याचे मूलभूत मंत्र आहे. यातून पुढे पक्षाचा उदय, निर्मिती आणि विस्तार झाला.