मुक्तपीठ टीम
काँग्रेसचे नेते राजीव सातव यांनी अखेर कोरोनावर मात केली आहे. त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे लवकरच राजीव सातव यांना रुग्ण्यालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेससाठी सतत कार्यरत राहणाऱ्या या नेत्याची प्रकृती ढासळल्यानंतर चिंता व्यक्त केली जात होती. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.
खासदार राजीव सातव यांना एप्रिल महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना पुण्यातील जहांगीर रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती गंभार झाल्याने मुंबईतील लीलावती रुग्णालयामधील डॉक्टरांची टीम पुण्याला रवाना झाली होती.
गेल्या आठवड्यापासून राजीव सातव यांच्या प्रकृतीत सुधारणा होताना दिसत आहे. अखेरीस १९ दिवसांच्या उपचारानंतर राजीव सातव यांची कोरोनाची चाचणी निगेटीव्ह आली आहे.
राजीव सातव म्हणजे काँग्रेसमधील सतत सक्रिय नेता
- राजीव सातव हे राहुल गांधी यांचे विश्वासू सहकारी आहेत.
- ४५ वर्षीय राजीव सातव यांच्यावर काँग्रेसने गुजरातचे राज्य प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवली आहे.
- ते काँग्रेसच्या कार्यकारणीचे निमंत्रक आहेत.
- राजीव सातव यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने २०१७ मधील गुजरात विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळवलं होतं.
- फेब्रुवारी २०१० ते डिसेंबर २०१४ या काळात त्यांनी भारतीय युवक काँग्रेसचं अध्यक्षपदही भूषवलं होतं.
- राजीव सातव यांच्या आई रजनी सातव काँग्रेसच्या आमदार होत्या.
- राजीव सातव हे हिंगोली मतदारसंघातून खासदार म्हणून २०१४ साली निवडून आले होते.