Sunday, March 8, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईत कोरोना वाढतोय, कोरोना संसर्गानं राज ठाकरेंची शस्त्रक्रियाही पुढे ढकलली!

घाबरू नका, काळजी घ्या!

June 1, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Raj Thackeray (2)

मुक्तपीठ टीम

मुंबईत कोरोना पुन्हा फैलावतोय. मंगळवारी एका दिवसात कोरोनाचे ५०६ नवे रुग्ण सापडल्याने चिंता व्यक्त केली जातेय. त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. मागील काही काळापासून पायाच्या आजाराने त्रस्त असल्यामुळे ते मंगळवारी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल झाले होते आणि आज त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. मात्र पुन्हा एकदा त्यांना कोरोनाची लागण झाल्याने ही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. राज ठाकरेंवर हिप बोनची शस्त्रक्रिया होणार आहे.

राज ठाकरेंची शस्त्रक्रिया पुढे ढकलली…

  • शस्त्रक्रिया करण्यापूर्वी २४ तास आधी काही वैद्यकीय चाचण्या करण्यात येणार असल्याने राज ठाकरे मंगळवारी लीलावती रुग्णालयात दाखल झाले.
  • याच चाचण्यांदरम्यान आधी कोविड डेड सेलमुळे राज ठाकरेंना वैद्यकीय भूल (अ‍ॅनेस्थेशिया) देऊ शकत नसल्यामुळे लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी राज ठाकरेंची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलेले मात्र नंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
  • यामुळे आता त्यांची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली.

राज ठाकरेंनी दिली होती शस्त्रक्रियेची माहिती…

  • पायाचं दुखणं वाढल्यामुळे आणि वेगवेगळ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी आपला अयोध्या दौरा रद्द केला होता.
  • पुण्यातील सभेत बोलताना राज ठाकरेंनी आपल्या शस्त्रक्रिया बाबतही सविस्तर माहिती दिली होती.
  • राज ठाकरे यांनी म्हटलं होतं की, मी जेव्हा मागे पुण्यात आलो होतो, तेव्हाच मला पायाच्या दुखण्याचा त्रास सुरू झाला होता.
  • जेव्हा मी मुंबईत परतलो तेव्हा काही टेस्ट करण्यात आल्या होत्या.
  • या टेस्टनंतर डॉक्टरांनी मला मला हिप बोनचं ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला.
  • एक जूनला हिप बोनची शस्त्रक्रिया करण्यात येणारे.
  • म्हणूनच मी मुद्दामहून तुम्हाला याबद्दल माहिती दिली.
  • तुम्हाला न सांगताच शस्त्रक्रिया करण्यासाठी गेलो तर पत्रकार काहीही सांगू शकतात.

Tags: coronamumbaiRaj Thackerayकोरोनामनसेराज ठाकरेहिप बोन शस्त्रक्रिया
Previous Post

तिबेटची परंपरा, भारताची भव्यता!

Next Post

केंद्राच्या योजनांमध्ये राज्याचा मोठा वाटा, पंधरा जिल्ह्यातील लाभार्थींशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा संवाद

Next Post
Uddhav Thackeray

केंद्राच्या योजनांमध्ये राज्याचा मोठा वाटा, पंधरा जिल्ह्यातील लाभार्थींशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा संवाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!