मुक्तपीठ टीम
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सरकार आणि माध्यमांनाही खडे बोल सुनावले. कोरोना उफाळू लागताच व्यवस्था झाली असती तर आज खाटा कमी पडल्या नसत्या. पुन्हा एकदा लॉकडाऊन हे लोकांमध्ये पसरलं, पेशंट वाढत आहेत, किंबहुना आधी जी लाट आली, त्यापेक्षा मोठी लाट आहे. हे महाराष्ट्रातच का दिसतंय? अशा खडा सवाल राज ठाकरे यांनी विचारला. इतर राज्यांमधून लोक येतात. अनेक राज्यात कोरोनाचे पेशंट मोजले जात नाहीत, त्यामुळे ते आकडे समोर येत नाहीत. तिथे मोजले तर असेच आकडे समोर येतील.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन विविध विषयावर संवाद साधला. माझं मुख्यमंत्र्यांशी काय बोलणं झालं, ते सांगण्यासाठी पत्रकार परिषद आज राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती.
पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे म्हणाले, काल मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. या लॉकडाऊनबाबत भेटीची विनंती केली होती, त्यांचा फोन आला की त्यांच्या आजूबाजूला अनेक लोक कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे त्यांनी स्वत:ला क्वारंटाईन करुन घेतलं आहे. त्यामुळे झूमवर बोलण्याचं ठरलं. आम्ही दोघंच असल्यामुळे आमच्यात काय बोलणं झालं, हे सांगण्यासाठी मी आज भेटतोय.
पुन्हा एकदा लॉकडाऊन हे लोकांमध्ये पसरलं, पेशंट वाढत आहेत, किंबहुना आधी जी लाट आली, त्यापेक्षा मोठी लाट आहे. हे महाराष्ट्रातच का दिसतंय? अशा खडा सवाल राज ठाकरे यांनी विचारला.
पत्रकार जे सांगतात ते त्यांनीही केलं पाहिजे!
राज ठाकरे यांनी पत्रकारांना, माध्यमांनाही खडे बोल सुनावले. त्यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच खडसावलं, “मला सुरुवातीला, सर्व पत्रकारांना एक गोष्ट सांगायची आहे. आपल्या टेव्ही चॅनलवर तुम्ही लोकांना जे सांगता, ते तुम्ही कधी बघणार आहात. लोकांकडून अपेक्षा बाळगता, सोशल डिस्टन्सिंग वगैरे पाळा. पण तुम्ही कधी ते पाळणार आहात?”
राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे:
- महाराष्ट्र हे औद्योगिक राज्य, बाहेरुन येणाऱ्यांची संख्या जास्त, पश्चिम बंगालमध्ये निवडणुका, शेतकऱ्यांचे मोर्चे सुरु आहेत, तिकडे कोरोना, किंवा लाटा नाहीत. हे महाराष्ट्रातच सर्व सुरु आहे. देशात महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे जिथे कोरोना असल्याचं चित्र दिसते.
- अनेक राज्यात कोरोनाचे पेशंट मोजले जात नाहीत, त्यामुळे ते आकडे समोर येत नाहीत. तिथे मोजले तर असेच आकडे समोर येतील.
- लॉकडाऊनमध्ये जे कामगार परत गेले त्यावेळी मी मागणी केली होती, जे लोक परत येतील त्यांची मोजणी करा आणि चाचणी करा. पण त्यांची मोजणी झालीच नाही. आज कोरोना आहे, उद्या दुसरं काही असेल, हे दुष्टचक्र न थांबणारं
- जे छोटे उद्योग आहेत, त्यांना उत्पादन करायला सांगितलंय पण विक्रीला बंदी आहे, असं असेल तर उत्पादन करुन ठेवायचं कुठे, विकायचं नाही तर उत्पादन का करायचं… म्हणून मी सांगितलं दोन तीन दिवस विक्रीसाठी सुरु ठेवा.
- छोट्या व्यापाऱ्यांना आठवड्यातून २-३ दिवस दुकानं सुरु करण्यास परवानगी द्या
- अनेकांनी छोटी मोठी कर्ज घेतली आहेत. बँकांकडे पैसा गेला पाहिजे मान्य, पण लोकांकडे पैसा असेल तर बँकात जाईल. सक्तीने वसूल केलं जात आहे.
- ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे, मग लोकांनी हप्ते कसे भरावे?
- सरसकट लॉकडाऊन काळात वीजबिल माफ करणे
- जीएसटीबाबत व्यापाऱ्यांना सूट द्या, राज्याने केंद्राशी बोलावं
- कंत्राटी कामगारांना प्रत्येक वेळी कामावर घेण्यापेक्षा त्यांना गरज लागेल त्या विभागात कायमस्वरुपी कामासाठी घ्या.
- सराव करणाऱ्या खेळाडूंना सवलत द्या- राज ठाकरे
- जीम, सलून यांनाही दोन-तीन दिवस सुरु ठेवण्याची परवानगी द्यावी
- स्वीमिंग पूल बंद ठिक आहे.. पण खेळाडूंना सवलत हवी. स्वीमिंग पूल असो वा अन्य खेळ, बॉडी बिल्डरना सराव करण्यासाठी जीम सुरु ठेवावी.
- दहावी- बारावीच्या मुलांना परीक्षा न घेता पुढे ढकला अर्थात उत्तीर्ण करा.
- कोरोनाच्या संकटाची दाहकता पाहता, या काळात शेतकऱ्यांना हमीभाव द्या, राज ठाकरे यांची मागणी.
- या हॉस्पिटलना जाणीवा नसतील तर ती करुन दिली पाहिजे.. आमच्या जाणीवा करुन देण्याची पद्धती वेगळ्या आहेत
- कोरोना लसीकरणात देशभरात सुरुवात झालेली असताना आता लसीकरण प्रक्रियेत वयाची मर्यादा नसावी ही बाब त्यांनी जाणीवपूर्वक अधोरेखित केली.
- बॉम्बची गाडी पोलिसांनी भरली, ती कोणाच्या सांगण्यावरुन ठेवली? चौकशी ही अनिल देशमुख यांची होईलच. पण, चौकशी ही झालीच पाहिजे, प्रत्येक वेळेला एखादा विषय येतो आणि त्याला फाटे फुटतात.
- लसीकरण वाढवायला हवं, त्याला वयाचं बंधन नको, त्यातील टेक्निकल बाबी मला माहिती नाहीत, पण वयाचं बंधन नको
- सुशांतच्या केसमध्ये आत्महत्या केली सुशांत सिंह राजपूतने आणि जेलमध्ये गेला अर्णब गोस्वामी.. कशाचा कशाशी संबंध?
- उद्धव ठाकरे यांच्या हातामध्ये राज्य आलंय की त्यांच्यावर राज्य आलंय, काल मला हा कोणीतरी विनोद पाठवला
- ४० दिवसात राजीनामे हे काहीतरी केलंय म्हणून राजीनामे दिले. सरकार पाडण्यासाठी प्रयत्न होत आहेत म्हणजे मंत्र्यांकडूनही काही होत आहे. ती काही इमारत आहे का पिलर काढले आणि पडले, मंत्र्यांनीही गैर कृत्य करु नये.
राज ठाकरेंचा व्हायरल विनोद
मला काल एक विनोद एकाने सांगितला, ‘सध्या उद्धव ठाकरेंची परिस्थिती पाहून त्यांच्या हातात राज्य दिलं आहे का त्यांच्यावर राज्य आलं आहे?’