मुक्तपीठ टीम
केंद्रातील मोदी सरकारच्या नवीन कृषी कायद्यांविरोधात अडीच महिन्यांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांमध्ये केंद्राच्या निर्णयाविरोधात स्पष्ट नाराजी आणि संताप दिसत असून भाजपच्या मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या नाराजीला सामोरे जावे लागत आहे.नव्या कृषी कायद्यांचे महत्त्व सांगण्यासाठी गेलेले केंद्रीय मंत्री संजीव बालियान आणि अन्य भाजप नेत्यांना रविवारी शामली येथे शेतकऱ्यांच्या विरोधाचा सामना करवा लागला. भैंसवाल येथे केंद्रीय राज्यमंत्र्याविरोधात शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली.
शेतकऱ्यांशी बोलणी करण्यासाठी जाणाऱ्या भाजप नेत्यांच्या मार्गात गावकऱ्यांनी ट्रॅक्टर लावून त्यांना गावात जाण्यासाठी रोखले. मोठी घोषणाबाजी झाली. शेतकऱ्यांनी केलेल्या विरोधाबद्दल बालियान म्हणाले की, लोकांच्या विरोधामुळे आणि मुर्दाबादच्या घोषणा दिल्यानं मी थांबणार नाही. मात्र प्रचंड विरोधामुळे मंत्र्यांचा ताफा गावातून परत फिरला.
किसान बिल के फ़ायदे बताने पहुँचे उत्तरप्रदेश के भाजपा नेता संजीव बालियान का जनता ने किया भारी विरोध।
किसान एकता ज़िंदाबाद।✊ pic.twitter.com/xvVvOOxYDD
— Jatinder Kumar ( Tony ) (@tonyJatinder9) February 21, 2021
गृहमंत्री अमित शहा यांनी शेतकऱ्यांमधील कृषी कायद्याविषयी गैरसमज दूर करण्याची जबाबदारी भाजपाच्या शेतकरी नेत्यांना दिली आहे. त्यातही जाट नेत्यांवर खास जबाबदारी सोपवली आहे.
“आधी तीनही कायदे परत घ्या, मगच गावात या” अशी घोषणा शेतकऱ्यांनी केली. “हा गोंधळ पाहून भाजपा नेत्यांनी आपल्या ताफ्यासह गाव सोडले. बत्तीसा खाप चौधरी बाबा सूरजमल यांनी सांगितले की भाजप नेत्यांना गावात येण्यासाठी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागेल मगच त्यांना गावात प्रवेश करता येईल.