मुक्तपीठ टीम
आजपासून मुंबईकरांपैकी जे सर्वसामान्य आहेत त्यांनाही लोकल ट्रेनने काही तास का होईना प्रवास करता येईल. राज्य सरकारच्या परवानगीनंतर रेल्वेने गाड्यांच्या फेऱ्या वाढवल्या. त्यानंतर आजपासून सर्वसामान्यांना सकाळी आणि रात्री प्रवासाची परवानगी दिली आहे. एकीकडे ही रेल्वे प्रवासाची चांगली बातमी तर दुसरीकडे अंधेरी आणि घाटकोपर मार्गावर धावणारी मेट्रोही आणखी एक तास जास्त धावणार आहे.
• सर्वसामान्यांना यावेळेत करता येणार प्रवास
सकाळच्या पहिल्या लोकलपासून सकाळी ७ वाजेपर्यंत. त्यानंतर दुपारी १२ पासून दुपारी ४ पर्यंत आणि रात्री ९ पासून शेवटच्या लोकलपर्यंत सर्वसामान्यांना प्रवास करता येणार आहे.
• सर्वसामान्यांना प्रवास कधी करता येणार नाही
सर्वसामान्यांना सकाळी ७ ते दुपारी १२ व दुपारी ४ ते रात्री ९ या कालावधीत उपनगरीय रेल्वेतून प्रवास करता येणार नाही. या वेळेत फक्त यापूर्वी परवानगी देण्यात आलेल्या विशिष्ट प्रवर्गातील प्रवासी प्रवास करू शकतील.
• उपहारगृहे व दुकानांसाठी निर्धारित वेळा
मुंबई व मुंबई उपनगर क्षेत्रातील दुकाने रात्री ११ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येतील तसेच उपहारगृहे रात्री १ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येतील.
मेट्रोच्या प्रवास वेळेतही वाढ
रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या नेतृत्वाखालील मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड घाटकोपर ते वर्सोवा दरम्यान मेट्रो सेवा पुरवते. १ फेब्रुवारीपासून मेट्रोनेही त्यांच्या कामाच्या तासात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
मेट्रो सेवा सकाळी ६.५० वाजता वर्सोवा तर ७.१५ वाजता घाटकोपरहून सुरु होईल
त्यासोबतच शेवटची मेट्रो रात्री ९.५० वाजता वर्सोवा आणि १०.१५ वाजता घाटकोपरुन असेल.
याशिवाय मेट्रो ते रेल्वे स्थानकांपर्यंत प्रवाश्यांच्या सोईसाठी अंधेरी आणि घाटकोपर येथील रेल्वे फूट ओव्हरब्रिज (एफओबी) देखील खुले राहतील. मेट्रोने थेट अंधेरी रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी अंधेरी (डब्ल्यू) येथे नवीन गेट उघडला जाईल. पहिली मेट्रो सुटण्याच्या १५ मिनिटांपूर्वी स्थानके उघडली जातील.
पाहा व्हिडीओ: