मुक्तपीठ टीम
रेल्वे प्रवासात सामान नेण्यासाठी हमाल शोधण्याच्या त्रासापासून काही दिवसातच प्रवाशांची सुटका होणार आहे. कारण रेल्वे एक अॅप बनवत आहे, ज्याद्वारे पोर्टर्सची सेवा आगाऊ बुक करता येऊ शकेल. यामध्ये पेमेंट अॅपद्वारे केले जाईल, त्यामुळे पैशाचीही अडचण येणार नाही. काहीवेळा हमाल आणि प्रवाशी यांच्यात अधिक पैशांच्या मुद्द्यावर वाद होतात. पण अॅपद्वारे बुकिंग केल्याने ही समस्याही दूर होईल.
अॅपद्वारे बुक करता येणार पोर्टर सेवा
- अॅपवर हमाल बुक करण्याची योजनेवर सध्या विचार सुरु आहे.
- या संकल्पनेवर लवकरच आता काम सुरु होईल. अद्याप टप्प्यावर आहे.
- यामध्ये पोर्टर सेवा आगाऊ बुक करता येते.
- जेणेकरून स्टेशनवर पोहचल्यावर तुम्हाला हमाल मिळतील.
- यामध्ये पेमेंट अॅपद्वारे केले जाईल.
- त्यामुळे रोख रकमेची अडचण येणार नाही.
- कधीकधी कुली अधिक पैसे मागतात आणि त्यातुन वाद निर्माण होतात.
- पण अॅपवरून बुकिंग करताना ही समस्या येणार नाही.
- यावर आता काम सुरू आहे आणि ते ४ ते ६ महिन्यांत पूर्ण होईल.
प्रवाशांची गैरसोय आणि हमालांची मनमानी टाळण्याचा प्रयत्न
- प्रवाशांची गैरसोय आणि हमालांची मनमानी टाळण्यासाठी रेल्वे हे मोबाइल अॅप विकसित करत आहे.
- प्रवासी या अॅपचा भरपूर लाभ घेऊ शकतात.
- जर एखाद्या प्रवाशाने अॅपद्वारे हमालाचे बुकिंग केले तर हमालाचा बॅच क्रमांक आणि मोबाईल नंबर त्याच्या मोबाईलवर पाठवला जाईल.
- त्यामुळे प्रवाशी स्टेशनवर पोहोचल्यावर हमालाशी संपर्क साधू शकतो किंवा हमाल देखील प्रवाशाशी संपर्क साधू शकतो.
लवकरच अॅपद्वारे इलेक्ट्रिक व्हीलचेअरची सुविधा
- रेल्वेने ज्येष्ठ नागरिक, अपंग प्रवासी आणि आजारी लोकांच्या सोयीसाठी एक पुढाकार घेतला आहे.
- दिव्यांग प्रवाशांसाठी नेहमीच व्हीलचेअरची समस्या असते. त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी ही प्रणाली सुरू करण्यात आली आहे.
- या अंतर्गत ते अॅपद्वारे ऑनलाईन व्हीलचेअर बुक करू शकतात.
- त्याचे भाडे २५० रुपये आहे.
- यात बॅटरीवर चालणारी व्हीलचेअर आहे.
- एक कर्मचारी त्याच्यासोबत असेल.
- तो प्रवाशाला त्यांच्या कारपर्यंत घेऊन जाईल.
- सध्या दिल्लीच्या हजरत निजामुद्दिनवर ही सुविधा सुरु करण्यात आली आहे.
- लवकरच देशात अन्य प्रमुख स्थानकांवर ही सुविधा सुरु होईल.