मुक्तपीठ टीम
“‘प्रश्न न पूछो ‘फ़क़ीर’ से, कैमरा पर बाँटे ज्ञान। जुमलों से भरा झोला लेकर, लूटे हिंदुस्तान॥” या आधुनिक चौपाईतून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. सातत्यानं वाढणारे इंधन दर आणि त्यामुळे वाढणारी महागाई भडकत असल्याच्या मुद्द्यावर त्यांनी मोदींवर ट्विटरास्त्र सोडले आहे. राहुल गांधी यांनी ट्वीट करुन जगभरातील पेट्रोलचे भाव आणि भारतातील पेट्रोलच्या दराची यादीच सर्वांसमोर मांडली आहे.
‘प्रश्न न पूछो ‘फ़क़ीर’ से, कैमरा पर बाँटे ज्ञान।
- राहुल गांधी ट्विटरद्वारे भारताच्या शेजारील देशांमधील पेट्रोलचे भाव सांगितले आहेत.
- राहुल गांधी यांनी केलेल्या ट्वीटनुसार अफगाणीस्तानात पेट्रोलचे दर ६६.९९ रुपये प्रति लीटर आहे.
- तर पाकिस्तानात ६२.३८ रुपये प्रति लीटर, श्रीलंकेत ७२.९६ रुपये प्रति लीटर, बांग्लादेशमध्ये ७८.५३ रुपये प्रति लीटर, भुतानमझ्ये ८६.२८ रुपये प्रति लीटर, नेपाळमध्ये ९७.०५ रुपये प्रिती लीटर, तर भारतात १०१.८१ रुपये प्रति लीटर पेट्रोल असल्याचं सांगितलं.
- ‘प्रश्न न पूछो ‘फ़क़ीर’ से, कैमरा पर बाँटे ज्ञान। जुमलों से भरा झोला लेकर, लूटे हिंदुस्तान॥’
Petrol Rate in Indian Rupees (₹)
Afghanistan: 66.99
Pakistan: 62.38
Sri Lanka: 72.96
Bangladesh: 78.53
Bhutan: 86.28
Nepal: 97.05
India: 101.81प्रश्न न पूछो ‘फ़क़ीर’ से, कैमरा पर बाँटे ज्ञान।
जुमलों से भरा झोला लेकर, लूटे हिंदुस्तान॥#MehangaiMuktBharat— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 31, 2022
गुरुवारीसुद्धा इंधनदरात वाढ!
- नव्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये आज पेट्रोलचा दर प्रति लिटर १०१.८१ रुपयांवर पोहोचला आहे.
- तर डिझेल ९३.०७ रुपये प्रति लिटर झाले आहे. मुंबईत पेट्रोल, डिझेलचा दर प्रति लिटर मागे ८४ पैशांनी वाढला आहे.
- मुंबईत पेट्रोलचा भाव प्रति लिटर ११६.७२ रुपयांवर पोहोचला आहे.
- तर डिझेलचा दर वाढून १००.९४ रुपये झाला आहे.