मुक्तपीठ टीम
पुदुच्चेरीमध्ये सत्तारुढ काँग्रेससमोर संकटं उभी राहिली आहेत. आमदार ए जॉन कुमार यांनी नुकताच आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. यानंतर, काँग्रेसचे सरकार अल्पमतात असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यास सुरुवात केली. तसेच इथे लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी पुदुच्चेरीचा दौर केला. या दौऱ्यात राहुल यांनी थेट नागरिकांशी संवाद साधण्यासाठी एका राजकीय महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींसोबत संवाद साधला. यासंबंधित एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
व्हायरल व्हिडीओत काय?
राहुल गांधी विद्यार्थिनींसोबत संवाद साधत असताना त्यातील एक विद्यार्थिनी राहुल यांची ऑटोग्राफ घेण्यासाठी मंचाजवळ पोहचते. राहुल तिला ऑटोग्राफ देण्यासाठी गेले असता त्या विद्यार्थिनीला भावना अनावर होऊन रडू लागली. त्यानंतर राहुल गांधी तिला जवळ घेऊन शांत केले.
View this post on Instagram
दरम्यान, राहुल गांधी यांना तेथील विद्यार्थ्यांनी प्रश्नही विचारले. तेव्हा राहुल यांना विद्यार्थ्यांनी ‘सर’ असे म्हटले असता, राहुल यांनी आपल्या मुख्याधापकांना सर म्हणा, शिक्षकांना सर म्हणा पण मला “राहुल” किंवा “राहुल अन्ना” म्हटलं तरी चालेल” असे म्हणाले.
My name is not ‘sir’, my name is Rahul, so call me Rahul please: Shri @RahulGandhi pic.twitter.com/uwAOhyzKno
— Congress (@INCIndia) February 18, 2021
राजीव गांधींच्या मारेकऱ्यांबद्दल द्वेष नाही!
पुडुच्चेरी दौर्या दरम्यान राहुल आपले वडील राजीव गांधी यांच्या आठवणींत हरवले. जेव्हा एका विद्यार्थिंनीने त्यांना ‘लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ एलाम (एलटीटीई) ने तुमच्या वडिलांची हत्या केली आहे, तेव्हा या लोकांबद्दल तुमची काय भावना आहे?’ असा प्रश्न विचारला.
राहुल शांतपणे म्हणाले की, “माझा कोणावर राग किंवा द्वेष नाही. नक्कीच, मी माझ्या वडिलांना गमावलं आणि माझ्यासाठी तो खूप कठीण काळ होती. मला खूप वाईट वाटते. पण मी त्या लोकांना क्षमा केली आहे”.