Saturday, June 7, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

काँग्रेसची विचारधारा जोडणारी तर भाजपा, आरएसएसची विचारधारा विभाजनवादी, द्वेष पसरवणारी:  खा. राहुल गांधी

राहुल गांधी यांच्या ऑनलाईन संबोधनाने काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ

November 12, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
Rahul Gandhi in National Orientation Program in Sevagram-1

मुक्तपीठ टीम

देशात दोन विचारधारा आहेत, एक काँग्रेसची तर दुसरी आरएसएस, भाजपची. काँग्रेसची विचारधारा ही खूप जुनी विचारधारा असून ती सर्वांना जोडणारी आहे तर आरएसएस व भाजपाची हिंदुत्वाची विचारधारा विभाजनवादी, व्देष पसरवणारी आहे. असा हल्लाबोल काँग्रेस नेते राहुलजी गांधी यांनी भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वंयसेवक संघावर केला आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या देशभरातील प्रमुख प्रतिनिधींचे सेवाग्राम येथे चार दिवसांच्या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा शुभारंभ खा. राहुल गांधी यांच्या ऑनलाइन संबोधनाने झाला.

4 National orientation programme Sevagram

 

खा. राहुल गांधी पुढे म्हणाले की, देशात हजारो वर्षांपासून असलेली विचारधारा हीच काँग्रेसची विचारधारा आहे. महात्मा गांधी यांनी त्याचाच अवलंब केला आणि त्याच मार्गावरून काँग्रेस मार्गक्रमण करत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि काँग्रेसचे आदर्श वेगवेगळे आहेत. आरएसएस व भाजपाचे आदर्श सावरकर आहेत तर काँग्रेसचे आदर्श महात्मा गांधी आहेत. पूर्वी काँग्रेस कार्यकर्ते पक्षाची विचारधारा समजून घेऊन नागरिकांपर्यंत पोहोचवत होते पण त्यात थोडा खंड पडलेला दिसतो आहे, त्याला काही कारणे आहेत. आता मात्र पुन्हा नव्या जोमाने काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवायची गरज आहे. काँग्रेसची विचारधारा संपूर्ण देशात पसरवायची आहे, जनतेला समजवायची आहे. काँग्रेसचा कोणताही कार्यकर्ता, नेता तो कितीही ज्येष्ठ श्रेष्ठ असला तरी त्याला प्रशिक्षण अनिवार्य केले पाहिजे. जेव्हा दहशतवाद, कलम ३७०, राष्ट्रीयता या मुद्यांवर चर्चा होते तेव्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्यावर संपूर्ण माहिती असली पाहिजे. त्याला ती लोकांसमोर व्यवस्थित मांडता आली पाहिजे यासाठी कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देऊन तयार करणे गरजेचे आहे.

2 National orientation programme Sevagram

काही लोक काँग्रेस पक्ष सोडून भाजपामध्ये जातात पण ते तिथे राहु शकत नाहीत. भाजपा, आरएसएस हे फक्त वापर करुन घेतात. तिथे सन्मान, प्रतिष्ठा मिळत नाही असे काँग्रेसमधून भाजापात गेलेले व परत काँग्रेसमध्ये आलेले लोक सांगतात. भितीपोटी काही लोक भाजपात जातात पण तेथे ते फारकाळ जगू शकत नाहीत. ज्याप्रमाणे महादेवाने विष गिळंकृत करून संपवले त्याच प्रकारे काँग्रेसची विचारधारा भाजपच्या विखारी विचारधारेला गिळंकृत करून संपवेल. आज सगळीकडे जो द्वेष पसरवला जात आहे. वातावरण विखारी केले जात आहे, हे चित्रही बदललेले दिसेल. काँग्रेसची विचारधारा गावखेड्यापर्यंत तळागाळातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी आधी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनातील दुःख व भीती दूर करणे गरजेचे आहे. त्यांच्या मनातील भीती व दुःख दूर करून त्यांना लढण्यासाठी सज्ज करा. भाजपा व काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये एक मूलभूत फरक आहे आणि तो म्हणजे काँग्रेस कार्यकर्त्यांचे चेहऱ्यावर नेहमी उत्साह व आनंद दिसतो तर भाजपा कार्यकर्त्यांचे चेहरे रागीट व भयग्रस्त दिसतात.

 

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रशिक्षण विभागाचे प्रमुख व काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य सचिन राव म्हणाले की, काँग्रेस पक्षाने स्वराज्य आणि सर्वोदयाचा मार्ग दिला त्यावरच आज हल्ला केला जात आहे. धर्मांध, हुकुमशाही वृत्तीचे लोक यावर हल्ला करून विभाजनवादी राजकारण केले जात आहे हे अत्यंत घातक आहे. संपूर्ण काँग्रेस पक्ष याविरोधात संघर्ष करत आहे. प्रशिक्षण हा या संघर्षातील सर्वात महत्वाचा भाग आहे. इथून संकल्प करून आपल्याला पुढे जायचे आहे.

 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रशिक्षण विभागाचे प्रमुख सचिन राव यांनी केले तर सूत्रसंचालन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. या प्रशिक्षण शिबिराचा समारोप १५ तारखेला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

 


Tags: CongressCongress National Orientation Programrahul gandhiSevagramकाँग्रेसराष्ट्रीय प्रशिक्षण शिबीरराहुल गांधीसेवाग्राम
Previous Post

भाजपच्या नेत्यांची एसटी आंदोलनात घुसखोरी करत चिथावणीखोर वक्तव्ये! – जयंत पाटील

Next Post

राज्यात ९२५ नवे रुग्ण, ९४५ रुग्ण बरे होऊन घरी!

Next Post
MCR 4-8-21

राज्यात ९२५ नवे रुग्ण, ९४५ रुग्ण बरे होऊन घरी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!