Sunday, May 18, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

“आणीबाणीचा निर्णय चुकीचाच! पण आता लोकशाहीतील संस्थांवरच हल्ला होतोय!”

राहुल गांधींचा इंदिराजींच्या निर्णयाला चुकीचं म्हणताना मोदींच्या कारभारावरही हल्ला

March 3, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
rahul gandhi

मुक्तपीठ टीम

“इंदिरा गांधींच्या सरकारमध्ये लागू झालेली आणीबाणी चुकीची होती,” असं त्यांचे नातू आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले. कॉर्नेल विद्यापीठाच्या कार्यक्रमात व्हर्च्युअल माध्यमातून संबोधित करताना ते म्हणाले, “आणीबाणी निश्चितपणे चुकीचीच होती. मात्र त्या काळी जे घडले आणि आज जे देशात होत आहे, या दोन्हींत मूलभूत फरक आहे.”

राहुल म्हणाले, “काँग्रेस भारताचा घटनात्मक पाया बळकावण्याचा प्रयत्न करत नाही. आमच्या पक्षाची मांडणी आम्हाला त्याची परवानगी देत नाही. अगदी कुणाची इच्छा असली तरीही आम्ही तसे करू शकत नाही.’

“आज प्रत्येक संस्थेवर एकाच विचारधारणेच्या लोकांचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न आहे.
काँग्रेसने कधीही मुलभूत आधार असलेल्या संस्थांचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला नाही. पण विद्यमान सरकार भारताच्या लोकशाही व्यवस्थेला नुकसान पोहोचवत आहे. प्रत्येक संस्थेच्या स्वायत्ततेवर हल्ला केला जातोय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रत्येक ठिकाणी घुसखोरी करत आहे. न्यायव्यवस्था, निवडणूक आयोगासारख्या स्वायत्त यंत्रणांवरही एका विचारधारेचा पगडा आहे. माध्यमांपासून ते न्यायालयापर्यंत सर्वांना लक्ष्य केलं जात आहे”, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

“संसदेत चर्चेवेळी माइक बंद केला जातो. आम्हाला संसदेत बोलू दिले जात नाही. लोकशाहीवर मोठा हल्ला होतोय. मणिपूरमध्ये राज्यपाल भाजपची मदत करत आहेत. पुदुच्चेरीत राज्यपालांनी अनेक विधेयकं मंजूर होऊ दिली नाहीत. कारण ती आरएसएसशी संबंधित होती. भारतात आता हुकूमशाही सुरू आहे,” असा आरोप त्यांनी केला.

“अंतर्गत लोकशाहीवर भाजपला कोणी प्रश्न विचारत नाही. मी पहिला माणूस असे म्हटले होते की पक्षात लोकशाही, त्यासाठी निवडणुका खूप महत्वाच्या आहेत, परंतु गंमतीची गोष्ट म्हणजे हे प्रश्न इतर कोणत्याही पक्षाने विचारले नाहीत. कुणी भाजप, बसप व सपातील अंतर्गत लोकशाहीवर प्रश्न विचारत नाही.”

माझ्याच पक्षाच्या लोकांनी माझ्यावर टीका केली
ते म्हणाले, “मी युवक काँग्रेस आणि एनएसयूआयच्या निवडणुकांवर भर दिला होता. मात्र माझ्याच पक्षाच्या लोकांनी माझ्यावर टीका केली. पक्षात निवडणुकीचा मुद्दा काढला तर स्वकियांनीच घेरले.”


Tags: BJPrahul gandhirssआरएसएसकाँग्रेसभाजपराहुल गांधी
Previous Post

रिझर्व्ह बँकेत १०वी उत्तीर्ण ८४१ ऑफिस अटेंडट पाहिजेत

Next Post

क्रीडा थोडक्यात: १) भारताचा फिरकीपटू वरुण चक्रवर्ती फिटनेस टेस्ट नापास झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्याचबरोबर टीममधील अधिकाऱ्यांनी देखील ही गोष्ट मान्य केली आहे की राष्ट्रीय क्रिकेट अकादमी येथे झालेल्या फिटनेस टेस्टमध्ये वरुण नापास झाला. पण त्याला आणखी एक संधी दिली जाऊ शकते. २) सहा वेळा जगज्जेतेपद पटकावणारी मेरी कोम तसेच आशियाई सुवर्णपदक विजेता अमित पांघल यांच्यासह भारताच्या १२ बॉक्सिंगपटूंनी एकही लढत न खेळता बोक्साम आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. पदकापासून ते फक्त एक विजय दूर आहेत. भारताचे ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेले नऊ तसेच अन्य पाच बॉक्सिंगपटू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. गेल्या वर्षी ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्यानंतर मेरी कोम (५१ किलो) पहिल्यांदाच रिंगणात उतरत आहे. तिला सलामीच्या लढतीत इटलीच्या जिओर्डना सोरेन्टिनो हिच्याशी लढत द्यावी लागेल. ३) भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा विवाहबंधनात अडकण्याची चर्चा असल्याने इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेलासुद्धा मुकण्याची शक्यता बळावली आहे. त्याशिवाय अनुभवी सलामीवीर रोहित शर्माला या मालिकेसाठी विश्रांती देण्यात येणार असल्याचे संकेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) विश्वसनीय सूत्रांनी दिले आहेत. १२ ते २० मार्चदरम्यान अहमदाबाद येथे ट्वेन्टी-२०, तर २३ ते २८ मार्चदरम्यान पुण्यात एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. ४) भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन, इंग्लंडचा कर्णधार जो रूट आणि वेस्ट इंडिजचा उदयोन्मुख फलंदाज कायले मेयर्स यांची ‘आयसीसी’ने फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूला दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठीच्या अंतिम तीन नामांकनात निवड केली आहे. इंग्लंडच्या विरुद्धच्या तीन कसोटींमध्ये २४ बळी घेत १७६ धावा केल्या. तर जो रुटने द्विशतकासह ३३३ धावा करत ६ बळी घेतले. तसेत कायले मेयर्स हा सुद्धा या पुरस्काराच्या शर्यतीत आहे. ५) इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीसाठी खेळपट्टीत फारसे बदल होण्याची शक्यता कमी आहे. त्याउलट फलंदाजांनी फिरकीपटूंविरुद्ध कशा प्रकारे कामगिरी उंचावता येईल, याकडे लक्ष द्यावे, असे स्पष्ट मत भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने व्यक्त केले. “चौथ्या कसोटीसाठी मोटेराच्या खेळपट्टीत फारसे बदल होणार नाहीत. तिसऱ्या कसोटीत गुलाबी चेंडू अपेक्षेपेक्षा जास्त वळल्याने फलंदाजांची भंबेरी उडाली. परंतु त्यामुळे पूर्णपणे फलंदाजांना पोषक खेळपट्टी बनवण्यात येणार नाही,” असे रहाणे म्हणाला.

Next Post

क्रीडा थोडक्यात: १) भारताचा फिरकीपटू वरुण चक्रवर्ती फिटनेस टेस्ट नापास झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्याचबरोबर टीममधील अधिकाऱ्यांनी देखील ही गोष्ट मान्य केली आहे की राष्ट्रीय क्रिकेट अकादमी येथे झालेल्या फिटनेस टेस्टमध्ये वरुण नापास झाला. पण त्याला आणखी एक संधी दिली जाऊ शकते. २) सहा वेळा जगज्जेतेपद पटकावणारी मेरी कोम तसेच आशियाई सुवर्णपदक विजेता अमित पांघल यांच्यासह भारताच्या १२ बॉक्सिंगपटूंनी एकही लढत न खेळता बोक्साम आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. पदकापासून ते फक्त एक विजय दूर आहेत. भारताचे ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेले नऊ तसेच अन्य पाच बॉक्सिंगपटू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. गेल्या वर्षी ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्यानंतर मेरी कोम (५१ किलो) पहिल्यांदाच रिंगणात उतरत आहे. तिला सलामीच्या लढतीत इटलीच्या जिओर्डना सोरेन्टिनो हिच्याशी लढत द्यावी लागेल. ३) भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा विवाहबंधनात अडकण्याची चर्चा असल्याने इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेलासुद्धा मुकण्याची शक्यता बळावली आहे. त्याशिवाय अनुभवी सलामीवीर रोहित शर्माला या मालिकेसाठी विश्रांती देण्यात येणार असल्याचे संकेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) विश्वसनीय सूत्रांनी दिले आहेत. १२ ते २० मार्चदरम्यान अहमदाबाद येथे ट्वेन्टी-२०, तर २३ ते २८ मार्चदरम्यान पुण्यात एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. ४) भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन, इंग्लंडचा कर्णधार जो रूट आणि वेस्ट इंडिजचा उदयोन्मुख फलंदाज कायले मेयर्स यांची ‘आयसीसी’ने फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूला दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठीच्या अंतिम तीन नामांकनात निवड केली आहे. इंग्लंडच्या विरुद्धच्या तीन कसोटींमध्ये २४ बळी घेत १७६ धावा केल्या. तर जो रुटने द्विशतकासह ३३३ धावा करत ६ बळी घेतले. तसेत कायले मेयर्स हा सुद्धा या पुरस्काराच्या शर्यतीत आहे. ५) इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीसाठी खेळपट्टीत फारसे बदल होण्याची शक्यता कमी आहे. त्याउलट फलंदाजांनी फिरकीपटूंविरुद्ध कशा प्रकारे कामगिरी उंचावता येईल, याकडे लक्ष द्यावे, असे स्पष्ट मत भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने व्यक्त केले. "चौथ्या कसोटीसाठी मोटेराच्या खेळपट्टीत फारसे बदल होणार नाहीत. तिसऱ्या कसोटीत गुलाबी चेंडू अपेक्षेपेक्षा जास्त वळल्याने फलंदाजांची भंबेरी उडाली. परंतु त्यामुळे पूर्णपणे फलंदाजांना पोषक खेळपट्टी बनवण्यात येणार नाही," असे रहाणे म्हणाला.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!