मुक्तपीठ टीम
भाजपाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधानानंतर आखाती देशातून टीकेची झोड उडाली आहे. कतार, कुवेत, इराण आणि सौदी अरेबिया तसेच ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन (ओआयसी) या इस्लामिक देशांच्या संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. भारतानं माफी मागावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपावर सडकून टीका केली आहे.भाजपाच्या धर्मांधतेमुळे जागतिक स्तरावर भारताची नाचक्की झाल्याचे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधींची भाजपावर भाजपाचं नुकसान केल्याची टीका
- भाजपाची धार्मिक कट्टरता देशाला आतून कमकुवत करत असल्याचं राहुल गांधींनी म्हटलं आहे.
- त्यांनी ट्वीट करत म्हटलं की, अंतर्गत विभाजनामुळे भारत बाहेरून कमकुवत होत आहे.
- भाजपाच्या धर्मांधतेमुळे केवळ आपसात दरी निर्माण झाली नाही, तर जागतिक स्तरावर भारताची नाचक्की झाली आहे.
Divided internally, India becomes weak externally.
BJP’s shameful bigotry has not only isolated us, but also damaged India’s standing globally.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 6, 2022
भाजपा नेत्यांचा बेताल तोंडाळपणा, दंगल आणि आंतरराष्ट्रीय वाद!
- भाजपाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर अपमानास्पद वक्तव्य केलं होतं.
- त्याचबरोबर दिल्ली भाजपा मीडिया सेल प्रमुख नवीन जिंदाल यांनीही अशाच प्रकारचं विधान केलं होतं.
- त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद जगभर उमटत आहेत.
- उत्तर प्रदेशातील कानपूर याठिकाणी दोन गटात दंगल देखील उसळली.
- तर आखाती देशांनी या विधानावर आक्षेप घेत भारतावर नाराजी व्यक्त केली.
- जागतिक स्तरावरून माफीची मागणी करण्यात आली आहे.