मुक्तपीठ टीम
दुचाकी आणि तीनचाकी वाहन उत्पादक टीव्हीएस मोटर कंपनीने पेट्रोनससोबत एक भागीदारी करार केला आहे. या भागीदारीनुसार पेट्रोनस टीव्हीएस रेसिंग या भारतातील पहिल्या फॅक्टरी रेसिंग टीमची टायटल पार्टनर बनणार आहे. यंदाच्या सीझनमध्ये पेट्रोनस आपले इंजिन ऑइल पेट्रोनस स्प्रिंटा या टीमला पुरवण्यासाठी सज्ज आहे. टीमचे नवे नाव पेट्रोनस टीव्हीएस रेसिंग टीम असे आहे. ही टीम स्थानिक रोड-रेसिंग, सुपरक्रॉस आणि रॅली प्रकारांमध्ये भाग घेईल, यामध्ये इंडियन नॅशनल मोटरसायकल रेसिंग चॅम्पियनशिप (आयएनएमआरसी), इंडियन नॅशनल सुपरक्रॉस चॅम्पियनशिप (आयएनएससी) आणि इंडियन नॅशनल रॅली चॅम्पियनशिप (आयएनआरसी) यांचा समावेश असणार आहे.
टीव्हीएस मोटर कंपनीसोबतच्या या भागीदारीमध्ये पेट्रोनस ल्युब्रिकंट्स इंटरनॅशनलसोबत (पीएलआय) धोरणात्मक व्यावसायिक भागीदारीचा देखील समावेश आहे. या भागीदारीअंतर्गत पेट्रोनस टीव्हीएस टीआरयू४ रेसप्रो हे को-ब्रँडेड ऑइल बनवले जाणार असून भारतभरातील बाजारपेठांमध्ये मे २०२२ पासून ग्राहकांना ते खरेदी करता येईल.
टीव्हीएस मोटर कंपनीचे सीईओ श्री. केएन राधाकृष्णन यांनी सांगितले, “टीव्हीएस रेसिंगमध्ये पेट्रोनस आमच्यासोबत आमचे भागीदार म्हणून आहेत ही आमच्यासाठी खूप आनंदाची बाब आहे. पेट्रोनसकडे अनेक प्रगतिशील तंत्रज्ञान सुविधा उपलब्ध आहेत ज्यामुळे मोठमोठ्या रेसिंग स्पर्धांमध्ये लक्षणीय यश नोंदवले आहे. मला पक्की खात्री आहे की, पेट्रोनसची जागतिक नैपुण्ये, मोटरस्पोर्ट्समध्ये मजबूत उपस्थिती आणि टीव्हीएस रेसिंगचा गेल्या चार दशकांचा प्रभावी रेसिंग अनुभव यांचा मिलाप आम्हाला एका नव्या उंचीवर नेऊन पोहोचवेल.”
डाऊनस्ट्रीम पेट्रोनसचे कार्यकारी उपाध्यक्ष व सीईओ श्री. दातुक सझली हमझाह यांनी सांगितले, “भारतातील संपूर्ण मूल्य शृंखलेमध्ये आघाडी मिळवणे पेट्रोनसने सुरु ठेवले आहे. आमच्या लक्षणीय पोर्टफोलिओमध्ये इंडियनऑइल पेट्रोनस प्रायव्हेट लिमिटेडमार्फत (आयपीपीएल) एलपीजीचा पुरवठा करणे, एमप्लस एनर्जीमार्फत रुफटॉप सोलर पॅनेल्स पुरवणे यांचा समावेश आहे. आज आम्ही भारतातील एक सर्वात प्रतिष्ठित ओईएम टीव्हीएस मोटर कंपनीसोबत पेट्रोनस टीव्हीएस रेसिंग टीम लॉन्च करत एक प्रभावी भागीदारी केली आहे. जागतिक पातळीवरील मोटरस्पोर्ट्समध्ये पेट्रोनस ल्युब्रिकंट्सची आजवरची कारकीर्द अतिशय दमदार राहिली असून टीव्हीएस रेसिंगच्या महत्त्वाकांक्षांना पाठिंबा देताना आम्हाला अभिमान वाटत आहे.”
नव्या घडामोडींबाबत टीव्हीएस मोटर कंपनीचे न्यू प्रॉडक्ट डेव्हलपमेंटचे उपाध्यक्ष श्री मेघश्याम एल दिघोले यांनी सांगितले, “गेल्या चार दशकांमध्ये भारतीय मोटरस्पोर्ट्समध्ये टीव्हीएस रेसिंगने प्रमुख स्थान निर्माण केले आहे. देशात मोटर रेसिंगसाठी आम्ही वचनबद्ध असून या खेळात जास्तीत जास्त रुची आणि उत्साह निर्माण करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. पेट्रोनससोबत आमची भागीदारी हे देखील याच दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल असून टीव्हीएस रेसिंग टीमचे पेट्रोनस टीव्हीएस रेसिंग टीम असे नवे नाव घोषित करताना मला अतिशय आनंद होत आहे.”
पेट्रोनसचे सिनियर जनरल मॅनेजर, ग्रुप स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन्स श्री दातीन अनिता अझरीना अब्दुल अझीझ म्हणाले, “जागतिक पातळीवरील मोटरस्पोर्ट्स स्पर्धांमध्ये आमच्या सहभागामुळे ट्रॅक तसेच प्रत्यक्ष रस्त्यावरील प्रवासासाठीच्या आमच्या फ्ल्युइड टेक्नॉलॉजी सोल्युशन्समध्ये सातत्याने नावीन्य आणण्यात आम्ही सक्षम झालो आहोत. टीव्हीएस रेसिंग टीमसोबत भागीदारी केल्याचा आणि त्यांना आमच्या कौशल्यांचे लाभ प्रदान करत असल्याचा आम्हाला अभिमान आहे. या प्रकल्पाने आम्हाला खूप प्रेरित केले आहे. आमच्या व्यवसायासाठी धोरणात्मक बाजारपेठ असलेल्या भारतात मोटरस्पोर्ट्सच्या चाहत्यांमध्ये आमच्या क्षमतांची पारख करण्यासाठी आणि पेट्रोनस ब्रँडविषयी व आमच्या धोरणांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आम्हाला अजून एक प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला आहे.”
पेट्रोनस ल्युब्रिकंट्स इंटरनॅशनलचे रिजनल मॅनेजिंग डायरेक्टर श्री जिऊसेपी पेद्रेत्ती यांनी सांगितले, “पेट्रोनस टीव्हीएस टीआरयू४ रेस प्रो इंजिन ऑइल हे पेट्रोनस-टीव्हीएस रेसिंग टीमकडून वापरल्या जात असलेल्या प्रीमियम ऍडिटिव्ह तंत्रज्ञानासह तयार करण्यात आले आहे. म्हणूनच टीव्हीएस ग्राहकांना त्यांच्या बाईक्समध्ये देखील तोच सर्वोत्तम परफॉर्मन्स अनुभवता येऊ शकतो.”
टीव्हीएस अपाचे सिरीज तयार करण्यात कंपनीच्या “ट्रॅक टू रोड” धोरणामार्फत टीव्हीएस रेसिंगने मोलाची भूमिका बजावली आहे. रेसमधील कामगिरीवर लक्ष केंद्रित करून, स्पोर्ट्सच्या चाहत्यांना हवे तसे, अतिशय आवडेल असे उत्पादन तयार करून या ब्रँडने स्पोर्ट्स विभागात नवे परिवर्तन घडवून आणले आहे. त्यामुळे १५०सीसी विभागात टीव्हीएस अपाचे हा सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेला ब्रँड बनला आहे. टीव्हीएस रेसिंग हे देशात वन मेक चॅम्पियनशिपचे प्रणेते असून भारतात सिरीजची सुरुवात करणारी ही पहिली भारतीय उत्पादक कंपनी आहे.
पेट्रोनस टीव्हीएस रेसिंग टीमची रेस मशीन्स या भागीदारीचा एक भाग म्हणून एक नवी लिव्हरी सुरु करतील. ही टीम रोड-रेसिंग, सुपरक्रॉस आणि रॅली फॉरमॅट्समध्ये सहभागी होईल, यामध्ये इंडियन नॅशनल मोटरसायकल रेसिंग चॅम्पियनशिप (आयएनएमआरसी), इंडियन नॅशनल सुपरक्रॉस चॅम्पियनशिप (आयएनएससी) आणि इंडियन नॅशनल रॅली चॅम्पियनशिप (आयएनआरसी) यांचा समावेश असणार आहे. या भागीदारीअंतर्गत पेट्रोनस टीव्हीएस टीआरयू४ रेसप्रो हे को-ब्रँडेड ऑइल बनवले जाणार असून भारतभरातील बाजारपेठांमध्ये ग्राहकांना ते खरेदी करता येईल.