मुक्तपीठ टीम
कोरोना महासंकटाच्या काळात देशातील बर्याच लोकांनी मदतीचा हात पुढे केला आहे आणि करत आहेत. कोरोनाचा भयावह उद्रेक झाल्यानंतर ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला. नागपूरमध्येही तसेच घडले. ऑक्सिजनअभावी लोकांचे प्राण धोक्यात आले. त्याचवेळी नागपूरमधील एक वाहतूक व्यावसायिक पुढे सरसावले तो नागपूरला ऑक्सिजन कमी न पडू देण्याचा संकल्प करूनच. प्यारेखान नावाचे हे वाहतूक व्यावसायिक समर्पित वृत्तीनं ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी प्रयत्न करीत आहेत. या सेवाकार्यामुळे केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरीही त्यांचे कौतुक करतात.
प्यारेखान हे आज नागपूरमधील एक मोठे वाहतूक व्यावसायिक आहेत. पण त्यांची नागपूरमधील सुरुवात अगदी सामान्य स्तरावरून झाली होती. ते एकेकाळी रेल्वे स्थानकाबाहेर संत्री विकत असत. तेच फळविक्रेते प्यारे खान आज ४०० कोटी रुपयांच्या कंपनीचे मालक आहेत. प्यारेखान याने ४०० मेट्रिक टन वैद्यकीय ऑक्सिजनसाठी ८५ लाख रुपयांची देणगीही दिली आहे. ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू…त्यामुळेच नागपूरकरांच्या मदतीला धावलेला हा महासंकटातील महानायक खरंतर प्राणदूतच ठरतो आहे.
नागपूरला प्राणवायू पुरवणारे प्राणदूत प्यारेखान!
• प्यारेखान हे नागपूरमधील सुप्रसिद्ध वाहतूक व्यावसायिक आहेत.
• सध्या प्यारेखान रुग्णालयांमध्ये सेवाभावाने ऑक्सिजन पोहोचवत आहे.
• नागपूरचे वाहतुक व्यावसायिक प्यारेखान यांनी स्वत: पुढाकार घेत चारपट किंमतीने इतर राज्यातून ऑक्सिजन खरेदी करून नागपूरच्या जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करून दिले. यासाठी त्यांनी आपल्या स्वतःच्या खिशातून ५० लाख खर्च केले.
• आतापर्यंत त्यांनी ३२ टन ऑक्सिजन पोहोचवले आहेत.
• प्यारेखान यांनी ४०० मेट्रिक टन वैद्यकीय ऑक्सिजनसाठी ८५ लाख रुपयांची देणगीही दिली आहे.
• यासोबत स्वखर्चातून आपत्कालीन स्थितीत चीन वरून त्यांनी ५० लाखांचा ऑक्सिजन किट आयात करत प्रशासनाला उपलब्ध करून दिल्या.
• जेव्हा प्यारेखान यांचे हे कार्य केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना कळले त्यांनतर नितीन गडकरी यांनी प्यारेखान यांना बोलावून घेतले व जिल्हा प्रशासनाला त्याच्या कौशल्याचा उपयोग करून घेण्याच्या सूचना केला.
• त्यांच्या या कौशल्याच्या जोरावर आज नागपूर मध्ये रोज १३० टन ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे.
• ऑक्सिजन ची सोय प्रशासन करते त्यांचे ट्रास्पोर्ट चे नियोजन प्यारेखान यांची टीम बघते.
• ऑक्सिजन वाहतुकीत होणारा खर्च परत करण्याचे आश्वासन प्रशासनाने प्यारे खान यांना दिले, पण ते म्हणाले की, रमजानच्या पवित्र महिन्यात मी जकात देण्यासारखेच हे सेवाकार्य करत आहे.
• इस्लाममध्ये रमजान महिन्यात प्रत्येक मुस्लिमांना जकात देणे आवश्यक मानले जाते.
• वर्षभरात झालेल्या एकूण उत्पन्नापैकी २.५ टक्के रक्कम गरीब किंवा गरजू लोकांना दिली जाते. याला जकात म्हणतात.
• प्यारेखान यांचे स्वत:चे जीवन अनेक संघर्षातून गेले आहे.
• १९९५ मध्ये त्याने नागपूर रेल्वे स्थानकाबाहेर संत्री विकून आपल्या कामाची सुरुवात केली.
• प्यारेखान यांचे वडील ताजबागच्या झोपडपट्टीत राहत होते.
• आज त्याच प्यारेखान यांच्याकडे ३०० ट्रक आहेत.
• ते स्वत: २ हजार ट्रकचे नेटवर्क सांभाळतात.
• भारताव्यतिरिक्त त्यांचे कार्यालय नेपाळ, बांगलादेश आणि भूतानमध्येही आहे.