मुक्तपीठ टीम
रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज १९ वा दिवस आहे. दोन्ही देशांमध्ये सलोख्याचा कोणताही मार्ग निघेल असे वाटत नाही. युक्रेनवरील हल्ल्यानंतर अमेरिका रशियावर सातत्याने निर्बंध लादत आहे. अशा परिस्थितीत आता रशियानेही अमेरिकन कंपन्यांवर कारवाई करण्याचे ठरवले आहे. एवढेच नाही तर या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना अटकही होऊ शकते.
रशिया अमेरिकन कंपन्यांवर कारवाई करण्याची शक्यता…
- युक्रेनवरील हल्ल्यानंतर अमेरिका रशियावर सातत्याने निर्बंध लादत आहे.
- अशा परिस्थितीत आता रशियानेही अमेरिकन कंपन्यांवर कारवाई करण्याचे ठरवले आहे.
- रिपोर्ट्सनुसार, रशिया अमेरिकन कंपन्यांची संपत्ती जप्त करू शकते. एवढेच नाही तर या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना अटकही होऊ शकते.
ऑस्ट्रेलियाची ३३ रशियन उद्योगपती, रणनीतीकारांवर बंदी
- ऑस्ट्रेलियाने ३३ रशियन उद्योगपती आणि रणनीतीकारांवर बंदी घातली आहे.
- यामध्ये रोमन अब्रामोविच, गॅझप्रॉमचे सीईओ अलेक्सी मिलर आणि रोसिया बँकेचे अध्यक्ष दिमित्री लेबेडेव्ह यांचा समावेश आहे.
- दरम्यान, रशिया आणि युक्रेनमधील चर्चेची चौथी फेरी एक ते दोन दिवसांत होऊ शकते, असे वृत्त आहे. दरम्यान, रशियाने युक्रेनवर हल्ले आणखी तीव्र केले आहेत.
- युक्रेनमधील २४ शहरांना लक्ष्य करण्यात येत आहे.
- यापैकी १९ मध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
- रशिया युक्रेनवर सातत्याने बॉम्ब हल्ले करत आहे.
- खार्किव, निप्रो आणि युक्रेनच्या इतर शहरांमधून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी अतिरिक्त गाड्या चालवल्या जाणार आहेत.
- मिळालेल्या माहितीनुसार, खार्किव येथून दोन गाड्या उपलब्ध होतील, तर डनिप्रोच्या गाड्याही उपलब्ध असतील.