स्मार्ट सिटीज मिशनखाली केलेल्या कामांमध्ये पुणे सर्वात पुढे आहे. पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने अनलॉकच्या मिशन बिगिन अगेनच्या कालावधीत ही कामगिरी बजावलीय. पुणे स्मार्ट सिटीसाठी ३३ प्रकल्प राबवण्यात येतायत. त्यासाठी ९०० कोटींची तरतूद करण्यात आलीय.
स्मार्ट सिटी मिशनखालील विकासकार्य औंध, बानेर, बालेवाडी पट्ट्यात सुरु आहे. हाच भाग स्मार्ट सिटी म्हणून निवडण्यात आलाय. त्याचबरोबर संपूर्ण पुणे शहरासाठी वाहतूक नाक्यांचा विकास आणि २४ तास पाणीपुरवठ्यासाठी सहकार्यही केलं जातंय.
लॉकडाऊन काळात थंडावलेल्या कामांना मिशन बिगिन अगेनमध्ये वेग दिला गेल्यानं पुणे नंबर वन ठरलंय. तर चौथ्या क्रमांकावरील पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रही दुसऱ्या क्रमांकावर झेपावलंय.